Share

वंचित भाजपची ‘बी’ टीम असल्याचा अशोक चव्हाण यांचा पुनरुच्चार

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर देखील कॉंग्रेसकडून पराभवाचे खापर दुसऱ्यांच्या माथी फोडण्याचे धंदे सुरूच आहेत. स्वतःचे अपयश झाकण्यासाठी कॉंग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीला लक्ष्य केले जात आहे. यातूनच पुन्हा एकदा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीवर भाजपची ‘बी’ टीम असल्याचा पुनरुच्चार केला आहे.

मुंबईत अशोक चव्हाण पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले,अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेल्या लाख-दिड लाख मतांनी आघाडीला नुकसान झालं तर भाजपा-शिवसेना युतीला फायदा झाल्याचं दिसलं. वंचित बहुजन आघाडी ही भाजपाची बी टीम आहे. त्यांच्या फायद्यासाठी त्यांनी उमेदवार उभे केले अशी टीका चव्हाण यांनी केली आहे.

विशेष म्हणजे पराभवाची जबाबदारी देखील अशोक चव्हाण यांनी स्वीकारली आहे. आम्ही प्रकाश आंबेडकर यांना बोलावलेही होते. पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. आघाडी झाली असती तर चित्र वेगळे दिसले असते. काँग्रेसच्या ८ ते ९ जागा वाढल्या असत्या वंचितलाही काही जागा मिळाल्या असत्या, असे ते म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!