🕒 1 min read
पुणे : कोरोना संसर्गाच्या गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली उद्याने येत्या १ नोव्हेंबरपासून खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतच आदेश महापालिकेकडून लवकरच काढला जाणार आहे.कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून शहरातील सर्व उद्याने बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता कोरोना संसर्ग बऱ्यापैकी आटोक्यात असताना उद्याने खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संसर्ग नियंत्रणात असला तरी अटी आणि शर्थीच्या आधारावर उद्याने खुली केली जाणार आहेत. असे महापौर मुरलीधर मोहळ यांनी सानितले आहे.
गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत पुणेकरांनी महापालिका प्रशासनाला उत्तम सहकार्य केले. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आता पूर्णपणे आपल्या नियंत्रणात आहे. त्यामुळे काही नियम घालून उद्याने सुरु करण्याचा निर्णय आपण घेत आहोत. ते नियम तंतोतंत पाळणे आवश्यक आहे. असे आवाहन देखील महापौरांनी केले आहे.
दरम्यान, केंद्रीय पथकाने शहरातील कोरोना संसर्गाचा आढावा घेतल्यानंतर डिसेंबर-जानेवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर उद्यानात वावरताना पुणेकरांनी योग्यप्रकारे आपली काळजी घ्यावी. काळजी उत्तम प्रकारे घेतल्यास आपल्याला कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यात सहज यश मिळू शकते. असा विश्वास देखील महापौर मुरलीधर मोहळ यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘माझी प्रकृती उत्तम आहे,थोड्याशा विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन’
- पंजाब मधील रावण पुतळा दहनानंतर भाजपा-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप
- फ्यूचर ग्रुपसोबतच्या करारावर बंदी, रिलायन्स रिटेलला मोठा झटका !
- एलआयसीची प्रारंभिक भाग विक्री पुढील आर्थिक वर्षात
- संजय राऊत काय माणूस आहे ? कसं आणि काय बोलतो हे त्याला तरी कळतं का ?

