Share

अशोक चव्हाणांनी करून दिली मुख्यमंत्र्यांना राजधर्माची आठवण

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : ‘मते मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हव्या तेवढ्या यात्रा काढाव्यात, पण यात्रेच्या नादात राजधर्म विसरून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये. आणखी कोणत्याही शेतकऱ्यांवर धर्मा पाटील होण्याची दुर्दैवी वेळ आणू नये,’ अशी टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये केली.

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा अकोल्यात येण्याच्या आदल्याच दिवशी जिल्ह्यातील सहा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सरकारी अनास्थेमुळे या सहा शेतकऱ्यांनी हे टोकाचे पाऊल उचलावे लागल्याने मुख्यमंत्री या सहा शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.

मात्र, मुख्यमंत्र्यांनी इतक्या गंभीर घटनेची साधी दखलही न घेता आणि या शेतकऱ्यांना न भेटताच अकोला दौरा आटोपता घेतल्याचा अशोक चव्हाण यांनी निषेध केला.

मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून ही यात्रा काढली नाही – आदित्य ठाकरे

विधानसभेची निवडणूक कॉंग्रेसकडून लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी खास बातमी

ओबीसी प्रवर्गाला लोकसंख्येनुसार आरक्षण मिळणार : फडणवीस

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!