Share

आशिष शेलार म्हणतात ‘राज आता शांत बसणार नाही’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीत संपूर्ण ताकदीनिशी लढण्याचा निर्णय मनसेने घेतला असून यानिमित्त आज वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे मनसेच्या इच्छुकांचा तसेच पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे भूमिका जाहीर करणार आहेत. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर करूनही त्यांच्या सभांनी लोकसभा निवडणुकीत चांगलीच रंगत आणली होती.

दरम्यानच्या काळात राज यांना ईडीने नोटीस दिल्यापासून एकदाही त्यांनी भाजपविरोधात कोठेही टीका केली नव्हती. तसेच मनसे विधानसभा निवडणूक लढवणार का, याबाबतही सारेच मौन पाळून होते. तथापि गेल्या आठवडय़ात उमेदवार निवडीबाबत मनसे नेत्यांच्या बैठका पार पडल्या. राज ठाकरे या मेळाव्यात सगळ्या इच्छुक उमेदवारांसोबत संवाद सांधणार आहेत. या मेळाव्यात राज ठाकरे विधानसभा निवडणुकीची रुपरेषा ठरवणार असल्याचीही शक्यता आहे.

यावर आता भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आपली भूमिका मांडली आहे ‘राज यांच्या व्यक्तिगत स्वभावानुसार ते गप्प बसणार नाहीत असं मला वाटतं,’ असं मत शेलार यांनी नोंदवले आहे. मात्र त्याच वेळी त्यांनी राज यांनी खोटा प्रचार करु नये असा इशाराही दिला. पुढे बोलताना शेलार यांनी ‘खोट्या विधानांवरुन प्रचार करण्याचा राज यांचा विचार असेल तर त्यांना मी इतकचं सांगेन की अभी तो पिक्चर बाकी है मेरे दोस्त,’ असा इशारच राज यांना दिला. ‘राज हे किती जागा जिंकतील यापेक्षा ते निवडणूक लढवतील की नाही हा प्रश्न आहे,’ असे उत्तर शेलार यांनी मनसे किती जागा जिंकेल या प्रश्नाला उत्तर देताना दिले.

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान राज ठाकरे यांनी भाजपा आणि शिवसेनेच्या विरोधात प्रचार केला होता. खासकरुन मोदी आणि अमित शाह यांना हटवा अशी भूमिका घेतली होती. त्यांचं ‘लाव रे तो व्हिडीओ’ हे वाक्यही चांगलंच प्रसिद्ध झालं होतं. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे काय भूमिका घेणार हे सोमवारी स्पष्ट होऊ शकतं. कारण मनसे १५० जागा लढवणार अशीही माहिती काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. मात्र त्याबाबत राज ठाकरे यांनी कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही. कदाचित हीच घोषणा राज ठाकरे सोमवारी करण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1178572680997437440?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1178572182785380352?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1178569992805081089?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!