🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्याच्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निर्णयाला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीनही पक्षांनी एकत्रितपणे सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. रिट याचिकेवर सुनावणी सुरू आहे. कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद सुरू असून भाजपने आजच सभागृहात बहुमत सिद्ध करावे, कपिल सिब्बल यांची न्यायालयात मागणी केली आहे.
आज शिवसेनेचे खासदार यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका केली आहे. बहुमत सिद्ध करता येईल, याभ्रमातून भाजप बाहेर पडेल, असे वक्तव्य राऊत यांनी केले आहे. महाविकासआघाडीकडे १६५आमदारांचे संख्याबळ असल्याचा दावा केला आहे. “अजित पवारांना फोडण आणि सरकार स्थापन करणं हा भाजपाचा डाव होता. तो त्यांच्यावर उलटला आहे. अजित पवारांबरोबर राष्ट्रवादीचे २५ आमदार येतील आणि बहुमत सिद्ध करता असं त्यांना वाटलं होतं. त्यामुळे अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद दिलं. पण, भाजपाकडं बहुमत होतं, त्यांनी काळोखात शपथ का?” असा सवाल संजय राऊत उपस्थित केला.
या टीकेला लगेचच भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच त्यांनी ३० तारखेला आपणच बहुमत सिद्ध करू, असा विश्वास व्यक्त केला आहे. पुढे बोलताना शेलार म्हणाले, “आम्ही तर सकाळी सहाच्या शाखेत जाणारे स्वंयसेवक आहोत. त्यामुळे शपथविधीचा कार्यक्रम सकाळी राम प्रहाराच्यावेळी घेण्यात आला असे त्यांनी सांगितले”.
पुढे बोलताना शेलार म्हणाले, “त्यांनी घाणेरड्या भाषेत बोलायला मी राऊत नाही”, असे म्हणत संजय राऊतांवर टीका केली. “याबरोबरच ३० तारखेला आपणच बहुमत सिद्ध करू, आमच्याकडे शिवसेनेशिवाय १७०आमदारांचे संख्याबळ आहे”, असा विश्वास व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1198497098070556672?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1198493749917048832?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
