Share

बुरखा बंदीवरून संतापलेल्या ओवैसींंनी शिवसेनेची तुलना केली पोपटाशी

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : श्रीलंकेमध्ये घडलेल्या साखळी बॉम्बस्फोटात शेकडो सामान्य नागरिकांचे प्राण गेले आहेत, बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल यांनी साहस दाखवत देशात बुरखा आणि नकाबवर बंदी घातली आहे.रावणाच्या लंकेत बुरखा बंदी होऊ शकते, तर रामच्या भारतात बुरखा बंदी का होऊ शकत नाही. अशा आशयाचा अग्रलेख आज सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात छापल्यानंतर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

शिवसेनेने भारतातही सुरक्षेच्या कारणास्तव बुरखा बंदी व्हायला हवी अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. यावर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी शिवसेना अशा प्रकारे देशात द्वेषाचे राजकारण खेळू पाहत आहे. शिवसेना पोपट असून त्यांना संविधान माहिती नसल्याचा घणाघात ओवैसी यांनी यावेळी केला.

असदुद्दीन ओवैसी नेमकं काय म्हणाले?
शिवसेना हा पोपट पक्ष आहे. सुरूवातील मोदींविरोधात तो बडबड करत होता. पण निवडणुकीत फायदा पाहून तो मोदींच्या बाजूने गेला. आता या पोपटाकडे बोलण्यासारखे काही नाही. त्यामुळे देशात द्वेषाचे राजकारण करण्याचा हा प्रयत्न केला जात आहे.

दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील ओवेसी यांना रोकठोक उत्तर दिले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!