Share

आयपीएल २०२१ च्या उर्वरित सामन्याची घोषणा होताच मुंबई इंडियन्सने केला ‘हिटमॅन’चा फोटो शेअर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयपीएल स्पर्धा कोरोनामुळे स्थगित करण्यात आली. यानंतर उर्वरित स्पर्धा कधी आणि कुठे होणार असे प्रश्न विचारले जाऊ लागले. आखेर शनिवारी २९ मे रोजी बीसीसीआयने एका सर्वसाधारण बैठकीत आयपीएलच्या उर्वरीत सामन्याविषयी घोषणा केली.

आयपीएल २०२१च्या उर्वरीत सामन्याची घोषणा होताच क्रिकेट चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. यादरम्यान आयपीएल स्पर्धेचे गतविजेते मुंबई इंडियन्सने एक ट्विट करत आनंद साजरा केला आहे. या ट्विटमध्ये मागील स्पर्धेचा अंतिम सामन्याचा फोटो शेअर करत ‘युएई, आम्ही पुन्हा येत आहोत’ असे कॅप्शन दिले. या फोटोला प्रतिक्रिया देताना मुंबईच्या एका चाहत्याने रोहित शर्माचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत रोहित शर्मा बुटाची लेस बांधताना दिसत आहे. त्याचवेळी रोहितच्या समोर टिव्हीवर ‘आयपीएल २०२१ चे उर्वरीत सामने युएईत’ अशी ब्रेकींग न्युज सुरु आहे.

मुंबई इंडियन्सने हा फोटो रिट्विट करत शेअर केला आहे आणि आम्ही सज्ज आहोत असे कॅप्शन दिले आहे. आयपीएल २०२१ च्या स्पर्धेतील पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कोरोनाने शिरकाव केल्या ही स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करण्यात आली. मात्र शनिवारी झालेल्या बीसीसीआयच्या सर्वसाधारण बैठकीत आयपीएल २०२१ स्पर्धेचे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात युएई येथे होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!