Share

राम मंदिराचे बांधकाम सुरु होताच करोना व्हायरस नष्ट होईल,भाजपनेता बरळला

Published On: 

नवी दिल्ली- श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण दिले जाणार आहे. येत्या ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन सोहळा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह निवडक ३०० जणांना निमंत्रण पाठवण्याची तयारी सुरू आहे.

या कार्यक्रमासाठी मोदी, आडवाणींसह 50 व्हीआयपी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, एका बाजूला या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असताना अनेक वाद देखील निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशचे भाजप नेते रामेश्वर शर्मा यांनी केलेल्या अजब दाव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

रामेश्वर शर्मा म्हणाले कि, श्रीरामाने मानवाचा कल्याणासाठी आणि राक्षसांच्या विनाशासाठी जन्म घेतला होता. राम मंदिराचे बांधकाम सुरु होताच करोना व्हायरस नष्ट होईल, असा दावा त्यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले, केवळ भारतच नव्हेतर संपूर्ण जगात करोनाने थैमान घातले आहे. आपल्याला केवळ सोशल डिस्टंसिंग पाळायचे नाही. तर देवाचेही स्मरण करायचे आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, कोरोनाचे संकट असताना अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळा होत असल्याने रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीकास्त्र सोडले होते. राम मंदिर बांधून कोरोना जाईल असे भाजपवाल्यांना वाटत असेल तर हरकत नाही, अशा शब्दांत पवारांनी टीका केली होती.या वक्तव्यामुळे पवार चांगलेच टीकेचे धनी बनले.

महत्वाच्या बातम्या-

‘मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करावी’

श्रावणात तरी मंदिरं खुली करा, शिवसेना नेते चांद्रकांत खैरेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी

भाजपचे तोंड बंद आंदोलन तर भिडेंकडून अजून सातारा सांगली बंदची हाक नाही, राऊतांचा टोला

गुजरात भाजपची जबादारी आता चंद्रकांत पाटलांच्या खांद्यावर…

‘आमच्या रागारगात शिवछत्रपतींचे रक्त, पुन्हा एकदा दिल्ली महाराष्ट्रासमोर झुकवू’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!