🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : बार्शी विधानसभा मतदारसंघात आजवर सहावेळा आमदार राहिलेले दिलीप सोपल राष्ट्रवादीमधून शिवसेनेत दाखल झाले आहेत. सातव्यांदा विधानसभेत जाण्यासाठी सोपल यांनी कंबर कसली आहे. यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या सोबतीला नातू आर्यन सोपल यांची ‘सोशल’नीती काम करत आहे. सोपल हे जुन्या पिढीचे राजकारणी असल्याने आत्ताच्या डिजिटल जमान्यात ते कोठेही कमी पडू नये, यासाठी आर्यनकडून सोशल मीडियाची खिंड लढवण्यात येत आहे.
वेगवेगळ्या चिन्हावर निवडून येणारे आमदार अशी दिलीप सोपल यांची ख्याती आहे. यंदा सोपल हे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढणार हे निश्चित आहे. हे चिन्ह घराघरात पोहचवणे गरजेचं असल्याने आर्यन सोपल यांची सोशल मिडिया टीम कामाला लागली आहे. अद्याप उमेदवारी अर्ज दाखल झाला नसला, तरी सोशल मिडीयाच्या माध्यमातून सोपल यांच्यासह शिवसेनेचा धनुष्यबाण मतदारांपर्यंत पोहचवला जात आहे. त्यामुळे आजोबा पारंपारिक पद्धतीने प्रचार करतायत, तर नातवाचा ‘डिजिटल’ प्रचारावर भर दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडून लढणारे राणाजगजितसिंह यांच्या प्रचारात आर्यन सोपल यांचा सक्रीय सहभाग राहिलेला होता. आता विधानसभा निवडणुकीत देखील त्यांचा सक्रीय सहभाग आहे. सोपल यांनी आजवर केलेली विकासकामे, जनतेतून त्यांना मिळणारा प्रतिसाद यांचे अपडेट सोशल मिडीयाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहचतील यांची दक्षता घेतली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1178626770800537601?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1178626308537864192?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
