मुंबई – बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा चांगलाच अडचणीत आला आहे. मुंबईत क्रूझवर चाललेल्या ड्रग्ज पार्टीतून अटक केलेल्या आर्यन खान आणि इतरांना 7 ऑक्टोबर पर्यंत एनसीबी कस्टडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, आर्यन खानला कालची रात्र नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कोठडीत काढावी लागली. क्रूझवरच्या ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटक केल्यानंतर न्यायालयानं आर्यन खानसह तिघांना एक दिवसाची एनसीबी कोठडी सुनावली होती. आज त्यांच्या जामिनावर सुनावणी झाली या सुनावणीमध्ये आर्यन खान आणि इतरांना 7 ऑक्टोबर पर्यंत एनसीबी कस्टडीत रवानगी करण्यात आली आहे.
Cruise ship party case | Mumbai's Esplanade Court sends Aryan Khan, Arbaz Seth Merchant and Munmun Dhamecha to NCB custody till 7th October pic.twitter.com/mU8wP06Jt4
— ANI (@ANI) October 4, 2021
ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे आर्यन खानची बाजू न्यायालयात मांडली. आर्यनवर ड्रग्जचं सेवन आणि खरेदी-विक्री केल्याचा आरोप आहे. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह हे एनसीबीकडून बाजू मांडली. तर, आर्यन खानच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह व धक्कादायक फोटो स्वरूपातील माहिती आढळल्याचे समोर आल्याने, त्याच्या कोठडीत ११ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली जावी. अशी मागणी यावेळी एनसीबीकडून करण्यात आली होती. आर्यनच्या फोन चॅटमध्ये बऱ्याच गंभीर स्वरूपातील लिंक आढळून आल्या आहेत, ज्यांचा संबंध आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी देखील लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- योगी सरकारच्या भ्याड कृत्याचा निषेध, दडपशाहीने लोकांचा आवाज दाबता येणार नाही – जोशी
- सोमठाणा येथील शेतकऱ्यांचा प्रश्न येत्या दहा दिवसात कायमचा मार्गी मार्गी लावणार – सदाभाऊ खोत
- ‘काळजी करू नका, तुम्हाला मदत मिळवून देणारच’, फडणवीसांची शेतकऱ्यांना ग्वाही
- ‘या’ नियमांचे पालन करणाऱ्या भाविकांनाच तुळजाभवानी मंदिरात प्रवेश दिला जाणार
- हिंगोली, नांदेड, यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, सेना खासदाराची मागणी

