मुंबई: क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला मुंबई हायकोर्टानं जामीन मंजूर केला आहे. आर्यन खान, मुनमुन धामेचा आणि अरबाज खान या तिघांना जामीन मंजूर झाला आहे. दरम्यान यावरूनच आता भाजप नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर निशाना साधला आहे.
आर्यनला बेल मिळाली, रात्री नवाब सुखाने झोपला असेल. आर्यन मोठे युद्ध जिंकून आला, की त्याने ऑलम्पिक मध्ये गोल्ड मेडल मिळवलं, तरी तो सुटल्यानंतर काही मोजक्या तरुणांनी फटाके वाजवले, नवाब मलिकला अशीच पिढी घडवायची आहे आणि दुर्दैवाने हा महाराष्ट्र मंत्रिमंडळात कौशल्य विकास मंत्री आहे. असे खोचक ट्वीट करत निलेश राणे यांनी नवाब मलिक यांच्यावर टीका केली आहे.
आर्यनला बेल मिळाली, रात्री नवाब सुखाने झोपला असेल. आर्यन मोठे युद्ध जिंकून आला, की त्याने ऑलम्पिक मध्ये गोल्ड मेडल मिळवलं, तरी तो सुटल्यानंतर काही मोजक्या तरुणांनी फटाके वाजवले, नवाब मलिकला अशीच पिढी घडवायची आहे आणि दुर्दैवाने हा महाराष्ट्र मंत्रिमंडळात कौशल्य विकास मंत्री आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 29, 2021
दरम्यान नवाब मलिक यांनी आर्यन खानला फसवले जात असल्याचा आरोप केला होता. तसेच त्यांनी क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अनेक खुलासे करत मोठी खळबळ माजवली आहे. त्यात आता आर्यन खान याला मुंबई हायकोर्टानं जामीन मंजूर केला आहे. यावरूनच निलेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- भारत-पाकिस्तान अंतिम सामना व्हावा; पाकिस्तानचे प्रशिक्षक सकलेन मुश्ताकची इच्छा
- इंडिज-बांगलादेश संघांत आज होणार लढत; आव्हान टिकविण्यासाठी विजय अनिवार्य
- मार्क झुकरबर्गची मोठी घोषणा; ‘फेसबुक’चे नाव बदलून ठेवले ‘हे’ नवे नाव
- 20 World Cup अफगाणिस्तान-पाकिस्तान सामना रंगणार आज
- हायकोर्टाकडून समीर वानखेडेंना दिलासा, अटक करण्यापूर्वी तीन दिवस अगोदर नोटीस द्यावी लागणार

