Share

Arvind Sawant | “कोश्यारी ते प्रसाद लाड सगळ्यांना हाकलून द्या”; अरविंद सावंत यांची संतप्त प्रतिक्रिया 

Published On: 

🕒 1 min read

Arvind Sawant | मुंबई : भाजपच्या अनेक नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं राज्यातील वातावरण अस्थिर झालं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या विधानानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत असतानाच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी शिवरायांबद्दल केलेलं विधान सध्या चर्चेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा औरंगजेबाची माफी मागितली असल्याचं ते म्हणालेत.

हे वाद ताजे असतानाच आज भाजपचे नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला असल्याचं म्हटलंय. त्यांच्या वक्तव्यानंतर विविध स्तरातून त्यांचा निषेध केला जात आहे.  यावरून ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी भाजपचा समाचार घेतला आहे.

“छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल महाराष्ट्र आणि देशभरातील लोकांच्या मनात प्रेम, आदर आणि अस्मिता आहे. त्यांच्याबाबत एकही अवाक्षक खपवून घेणार नाही, असा इशारा अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी दिला आहे.

भाजपवाल्यांना इतिहास नरेंद्र मोदींचा तयार करायचा आहे. यांचा स्वातंत्र्यलढाशी देखील संबंध नाही. सत्ता पैसा आणि माज एवढंच यांना कळतं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ते प्रसाद लाडपर्यंत या सगळ्यांना हाकलून दिलं पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

काय म्हणालेत प्रसाद लाड?

“हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला. रायगडावर शिवरायांचं बालपण गेलं आणि याच रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली”, असं प्रसाद लाड म्हणालेत.

भगतसिंह कोश्यारीचं वक्तव्य काय?

आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील.” तसेच “शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील”, असं भगतसिंह कोश्यारी यांनी म्हंटल आहे

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!