🕒 1 min read
नवी दिल्ली : आता प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. या पार्श्वभूमीवर 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत.
पूर्वी इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला ज्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, त्या कंपन्यादेखील त्यांच्या कार्सवर अधिकाधिक डिस्काऊंट देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
This will go a long way in curbing pollution in Delhi.
Delhi is fast becoming a modern city. Every Indian is proud of Delhi https://t.co/8M0UZeLuCf
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) February 25, 2021
या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारच्या सर्व विभागांमध्ये आता फक्त इलेक्ट्रिक वाहनांचा वापर होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आदेश दिले आहेत. दिल्ली सरकारने इलेक्ट्रिक वेहिकल 2020 लागू केले असून पुढील सहा महिन्यात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीवर चालणारी सर्व सरकारी वाहने बदलून इलेक्ट्रिक वाहने वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इलेक्ट्रिक वाहने विकत घेण्यासाठी किंवा भाडेतत्वावर घेण्यासाठी मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आली आहे. दिली सरकार 2000 इलेक्ट्रिक गाड्या विकत किंवा भाड्याने घेणार आहेत.
या अभियानाअंतर्गत पहिल्या दोन आठवड्यांत दुचाकी आणि तीन चाकी वाहन चालकांना इलेक्ट्रिक वाहने घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. तिसर्या आठवड्यात चार चाकी वाहन मालकांना प्रोत्साहन दिले जाईल. ऑगस्ट 2020 पर्यंत दिल्लीत सहा हजार इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे. दिल्लीत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढल्याने पर्यावरण हानी कमी होईल असा विश्वास दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दीपिका ठरली Levi’sची भारतातील पहिला महिला ब्रॅंड ऍम्बेसेडर
- थेट हात जोडत सुभाष देसाई यांनी वनमंत्री राठोड यांच्यावर बोलण टाळल
- पाणी भरण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला तीन वर्षे कारावास
- जालना जिल्ह्यात कोरोनाचे २ बळी, ८५ नव्या रुग्णांची भर, २१ जणांना डिस्चार्ज
- परभणीत चिंता वाढली! ४१ नव्या रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

