टीम महाराष्ट्र देशा : अंडरवर्ल्डचा कुख्यात डॉन अरुण गवळी यांनी मुंबईत आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. मुलगी गीता गवळी यांच्या विधानसभा उमेदवारी संदर्भात हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. अरुण गवळी सध्या २८ दिवसांच्या फरलोवर तुरुंगाबाहेर आहे.
विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. दरम्यान, शिवसेना नगरसेवकाच्या हत्येप्रकरणात शिक्षा भोगत असलेला अंडरवर्ल्डचा कुख्यात डॉन अरुण गवळी सध्या २८ दिवसांच्या फरलोवर तुरुंगाबाहेर आहे. ७ जूनला त्याचा फरलो (जामिन) संपणार आहे. दरम्यान, विधानसभा निवडणूक जवळ आल्याने मुलगी गीता गवळी यांना भायखळा येथून विधानसभा निवडणुकीला उतरवत आहे. आपल्या मुलीच्या राजकीय भविष्यासाठी जुळवाजुळव सुरु केली आहे. त्याची तयारी म्हणून त्यांनी हालचालीही सुरु केल्या आहेत. याचाच भाग म्हणून त्यांनी आज दगडी चाळ येथे आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्या मेळाव्यात कार्यकर्त्यांची मते जाणून घेत पुढील रणनीती आखली आहे.
विशेष म्हणजे, अरुण गवळी यांना फरलो मंजूर करताना माध्यमांशी न बोलण्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलणे टाळले. यावेळी त्याची मुलगी गीता गवळीने माध्यमांना मेळाव्याची माहिती दिली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
