टीम महाराष्ट्र देशा : मुंबईवर अधिकार तो फक्त बाळासाहेबच चालवू शकले अन्य कुणालाही ते जमलं नाही. किंबहुना जमणारही नाही आणि भर सभेत तर त्यांच्याशिवाय एवढं निडर पणे कोणीच बोलू शकल नाही. केशव सीताराम ठाकरे म्हणजे प्रबोधनकार ठाकरे यांचे पुत्र बाळ केशव ठाकरे यांचा जन्म २३ जानेवारी १९२७ रोजी पुण्यात झाला. प्रबोधनकारांसाठी ते बाळ होते तर मराठी माणसासाठी ते बाळासाहेब होते.
वर्ष १९६६ मार्मिकमधून व्यंगचित्रांच्या आधारे मराठी माणसाला जाग आणणाऱ्या बाळासाहेबांकडे मराठी माणूस येऊ लागला. आपल्या अडचणी सोडवण्यासाठी लोकं बाळासाहेबांकडे येत असत, एकदा सहज बसल्या बसल्या प्रबोधनकार बाळासाहेबांना म्हणाले बाळ तू एखादी संघटना का स्थापन करत नाहीस, लोक जमतायत त्याला संघटनेचे रूप देतोस की नाही ? त्यावेळी बाळासाहेब ही म्हणाले विचार तर तसाच आहे पण नाव आठवत नाही तेव्हा प्रबोधनकारांनी सांगितले शिवसेना नाव ठेव. १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना एका लहानशा घरात केवळ एक नारळ फोडून झाली होती.
दसऱ्याच्या मुहूर्तावर ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवसेनेचा पहिला मेळावा होणार असल्याचं ‘मार्मिक’मध्ये जाहीर झालं. ‘शिवाजी पार्क’वर सभा घ्यायची असं बाळासाहेबांनी ठरवलं. पण काही बुजुर्ग मंडळींनी पुरेशी उपस्थिती नसली तर पहिल्याच सभेचा बार फुसका ठरेल अशी शंका व्यक्त करत बंदिस्त सभागृहात पहिली बैठक घ्यायची सूचना केली. पण बाळासाहेब ठाम राहिले. सभेच्या दिवशी दुपारपासूनच ढोल-ताशे, लेझिमच्या तालावर पावलं टाकत मराठी माणूस शिवाजी पार्कवर गर्दी करू लागला. सायंकाळपर्यंत मैदान गर्दीने फुलून गेले. शाहीर साबळे यांच्या ‘महाराष्ट्र गीता’ने मेळाव्याची सुरुवात झाली.
प्रबोधनकारांनी ‘ठाकरे कुटुंबाचा बाळ या महाराष्ट्राला आज अर्पण करत आहे’ असे जाहीर केलं, आणि महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर ‘शिवसेना’ आणि ‘बाळासाहेब ठाकरे’ या दोन नव्या शक्तींचा उदय झाला. मुंबई महानगरपालिकेच्या १९६८ च्या निवडणुकीत शिवसेनेने मधु दंडवते यांच्या प्रजा समाजवादी पक्षाशी युती केली आणि शिवसेनेने ४० जागा जिंकल्या. डॉ. हेमचंद्र गुप्ते यांना शिवसेनेचा पहिला महापौर होण्याचा मान मिळाला.
बाळासाहेबांना अटक
फेब्रुवारी १९६८ च्या ‘मार्मिक’मध्ये बाळासाहेबांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर जळजळीत अग्रलेख लिहिला, आणि त्याचवर्षी नोव्हेंबरमध्ये ते बेळगावला गेले. परत आल्यावर त्यांनी इशारा दिला की ‘निश्चित कालमर्यादेत केंद्राने सीमाप्रश्न सोडवला नाही तर केंद्रीय मंत्र्यांना, काँग्रेस पुढाऱ्यांना मुंबईत प्रवेश नाही’.त्यातून आधी यशवंतराव चव्हाणांची आणि नंतर १९६९ मध्ये केंद्रीय अर्थमंत्री मुरारजी देसाई यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न झाला.
सत्तेच्या धुंदीत असलेल्या मुरारजींनी आंदोलकांवरून गाडी पुढे दामटण्यास चालकाला सांगितलं. त्यातून आंदोलन सुरू झालं व मुंबई पेटली. पोलिसांच्या गोळीबारात तब्बल ५२ माणसं मृत्युमुखी पडली. आंदोलन दडपण्यासाठी बाळासाहेबांना अटक झाली. ही त्यांच्या आयुष्यातील पहिली अटक. यातूनच शिवसेना स्टाईल ‘मुंबई बंद’ला सुरुवात झाली.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1195973088707399680?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1195965657793253376?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

