Share

कलम ३७० : ‘मोदींना विरोध करण्यासाठी राहुल गांधी शत्रूची बाजू घेतात’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : भारत सरकारने कलम ३७० हटवल्यानंतर सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. जागतिक स्तरावर देखील भारताच्या या निर्णयाचं स्वागत केले आहे. तसेच देशातील विरोधी पक्षातील नेते या निर्णयाच्या विरोधात आहेत. तसेच सरकारवर टीका करून या निर्णयाचे राजकारण करताना दिसत आहेत.

कलम ३७० हटवण्यावरून मुस्लीम धर्मगुरु इमाम मोहम्मद तौवहिदी यांनी ‘मोदींना विरोध करण्यासाठी राहुल गांधी शत्रूंची सोबत करतात. स्वत:च्या स्वार्थासाठी ते आणि सोनिया गांधी कॅमेरासमोर येऊन रडतात’ असा आरोप राहुल गांधी यांच्यावर केला आहे. तसेच त्यांनी भारताचे कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. कायमच काश्मीर हा भारताचा भाग असल्याची भूमिका घेणाऱ्या तौवहिदी यांनी कलम ३७० संदर्भातील निर्णयाला विरोध करणाऱ्यांवर सडकून टीका केली आहे.

पुढे बोलताना त्यांनी “राहुल गांधी हे अत्यंत वाईट राजकारणी आहेत. मोदींना विरोध करण्यासाठी ते शत्रूंची सोबत करतात. सोनिया गांधीही तशाच आहेत. गाझामधील कट्टरतावाद्यांशी असलेले त्यांचे संबंध विसरता येणार नाहीत. ते स्वत:च्या स्वार्थासाठी काम करतात आणि नंतर कॅमेरासमोर येऊन रडतात. हे मुरब्बी राजकारणी नाहीत अशा शब्दात गांधी कुटुंबावर निशाणा साधला आहे.

https://twitter.com/Imamofpeace/status/1160570756029276160?s=20

दरम्यान, कॉंग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी यांनी काश्मीरमध्ये हिंदू बहुसंख्य असते तर कलम ३७० हटवलं असतं का ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. पुढे बोलताना त्यांनी जम्मू काश्मीर मध्ये बहुसंख्य हिंदू असते तर कलम ३७० भाजपाने कधीही हटवलं नसतं असं त्यांनी म्हटलं आहे. जम्मू काश्मीर हे अस्थिर आणि अशांत आहे. मात्र भारतीय मीडिया त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो आहे असंही त्यांनी म्हटले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!