Share

Amol Mitkari | “सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील”; आव्हाडांच्या अटकेनंतर अमोल मिटकरींचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

Amol Mitkari | मुंबई : हर हर महादेव (har Har Mahadev) चित्रपटाच्या प्रदर्शनाचा शो ठाण्याच्या व्हिव्हियाना मॉलमधील सिनेमागृहात सुरु होता. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह चित्रपटाचा शो बंद पाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रेक्षक आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापटही झाली. या प्रकारानंतर आव्हाडांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. घटनेच्या तीन दिवसांनंतर ठाणे पोलिसांनी आव्हाडांना अटक केली आहे.

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावरील कारवाईचा निषेध करत अमोल मिटकरींनी ट्विटरवर राज्यात हुकुमशाही नांदत असल्याचं म्हटलं आहे. “राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक करून या सरकारने परत एकदा या राज्यात हुकूमशाही नांदते आहे याचा प्रत्यय करून दिल्याबद्दल सरकारचे धन्यवाद!” असं मिटकरींनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे.

राज्य सरकारवर टीका करतानाच मिटकरींनी अप्रत्यक्षपणे मनसेलाही टोला लगावला. “मुठभर ‘खोप्या’तील ‘देशी’ गुंडांच्या नादाला लागून सरकारने ज्या पद्धतीने हा प्रकार केलाय, त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील”, असा इशारा अमोल मिटकरींनी दिला आहे.

“राष्ट्रवादीचे नेते जितेंद्रजी आव्हाड यांना अटक करून या सरकारने परत एकदा या राज्यात हुकूमशाही नांदते आहे. याचा प्रत्यय करून दिल्याबद्दल सरकारचे धन्यवाद ! मुठभर ‘खोप्या’ तील ‘देशी’ गुंडांच्या नादाला लागून सरकारने ज्या पद्धतीने प्रकार केलाय त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील”, अशा आशयाचं ट्विट अमोल मिटकरी (Amol Mitkari ) यांनी केलंय.

दरम्यान, आव्हाडांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “एखादी व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी चुकीचं दाखवते, याला विरोध केल्यामुळे जितेंद्र आव्हाडांना अटक होत असेल, तर मी या अटकेचं मनापासून स्वागत करते.” त्या कामासाठी आम्हाला सर्वांनाही तुरुंगात जावं लागलं तरी चालेल. कारण छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्र सहन करणार नाही. या कामासाठी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) तुरुंगात जात असतील, तर जितेंद्र आव्हाडांचा आम्हाला अभिमान असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!