लखनऊ : लखीमपूर खेरीच्या शेतकरी आंदोलनात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, मंत्र्यांच्याच ताफ्यातील गाड्यांनी या शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप विरोधक करत आहेत. या दुर्घटनेनंतर उत्तरप्रदेशमधील राजकीय वातावरण तापले आहे.
काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी रात्री या शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी आल्या असता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर युपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आपल्या घरासमोर ठिय्या आंदोलनाला बसले होते. जिप्सी जाळण्याची घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले आहे. आता मृत शेतकऱ्यांना चिरडणाऱ्यांना अटक झाल्याशिवाय मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे परिस्थिती आनखी चिघळली आहे.
लखीमपूर हिंसाचारात केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशीष मिश्रा या घटनेस जबाबदार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आरोपीला अटक होईपर्यंत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणार नाही व करुही देणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. दरम्यान याप्रकरणी आशीष मिश्रांसह १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी शेतकऱ्यांचा आरोप फेटाळून लावला आहे. शेतकऱ्यांमध्ये लपून बसलेल्या काही गुंडांनी त्यांच्या वाहनांवर दगडफेक केली. काठ्या व तलवारींनी गाडी फोडण्यास सुरुवात केली, गाडीला रस्त्याच्या बाजूला असलेल्या दरीत लोटून देण्याचा प्रयत्न केला गेला असा आरोप अजय मिश्रा यांनी शेतकऱ्यांवर केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेशमध्ये आंदोलनाला हिंसक वळण; जिप्सी जाळली, अखिलेश पोलिसांच्या ताब्यात
- घरी जा, गुगलवर ‘टरबूज ऑफ महाराष्ट्र’ सर्च करा; खडसेंनी कार्यकर्त्यांना सांगितले काम
- ‘शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते, लाठ्या-काठ्या उचला, अन् जशास तसे उत्तर द्या’
- ‘शेतकऱ्यांना चिरडणं ही भाजपची ‘पॉलिसी’ आहे का?, त्यांना असं चिरडणं म्हणजे ब्रिटीशी वागणूक’
- तेही म्हणत असतील कारखान्याला माझे नाव देऊन वाट लावली- अजित पवार


