🕒 1 min read
मुंबई: एमआयएम चे खासदार इम्तियाझ जलील यांनी महाविकास आघाडीत सामील होण्याचा प्रस्ताव मांडल्यापासून राजकीय वर्तुळात चर्चांना आणि आरोपांना उधाण आले आहे. भाजप आणि शिवसेना एकमेकांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून लक्ष्य करत आहे. यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज हि भाजपला फैलावर घेतले आहे.
“छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण महाराष्ट्राला रोजच होत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातील दुश्मनांना एकच धडा चारशे वर्षांपूर्वी दिला. महाराष्ट्र दुश्मना पुढे झुकणार नाही. वाकणार नाही. महाराष्ट्र लढत राहील, स्वाभिमानासाठी हक्कांसाठी कष्टकऱ्यांसाठी आणि जर दुश्मन अंगावरती आला त्याची बोटे छाटली जातील” असे राऊत यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
