मुंबई : भारताचा विश्वविजेता क्रिकेटपटू हरभजन सिंगला आम आदमी पक्षाने पंजाबमधून राज्यसभेचे उमेदवार म्हणून नामांकन दिले आहे. यासोबतच पक्षाने आयआयटीचे प्राध्यापक संदीप पाठक, शिक्षणतज्ज्ञ अशोक कुमार मित्तल आणि दिल्लीचे आमदार राधव चढ्ढा यांना पंजाबमधून राज्यसभेचे उमेदवार म्हणून नियुक्त केले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला पंजाबमध्ये मोठा विजय मिळाला. पंजाबमधील राज्यसभेच्या पाच जागा ९ एप्रिल रोजी रिक्त होत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ मार्च आहे.
अनेक दिवसांपासून राज्यसभा सदस्यपदासाठी हरभजनच्या नावाची चर्चा सुरू होती. हरभजन सिंग क्रिकेटनंतर राजकारणाची इनिंग सुरू करणार आहे. हरभजनच्या आधी पंजाबच्या नवज्योत सिंग सिद्धू यांनी क्रिकेटमधून राजकारणात पाऊल ठेवले होते. प्रत्येक निवडणुकीत ते जिंकले, पण यावेळी त्यांचा पराभव झाला.
Meet AAP's 5 new Rajya Sabha MPs ????
1. Ashok Mittal
2. Harbhajan Singh
3. Raghav Chadha
4. Sandeep Pathak
5. Sanjeev Arora pic.twitter.com/wlRuemaajc— AAP (@AamAadmiParty) March 21, 2022
क्रिकेटबद्दल बोलायचे झाले, तर हरभजनचे बालपण संघर्षमय होते. वडिलांची सावली दूर झाल्यानंतर आईने त्याचा सांभाळ केला. राज्यसभा सदस्य म्हणून नामांकन मिळाल्याने कुटुंबीयांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. हरभजनने देशासह जालंधरचे नाव रोशन केले असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. ”देशात प्रतिभा आहे, त्यांना बाहेरचे जग दाखवले जाईल, खेळाडूंना चांगल्या पायाभूत सुविधा दिल्या जातील”, असे भज्जीने राज्यसभेचा सदस्य झाल्यानंतर म्हटले.
हरभजन सिंगने मागील वर्षी २४ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी क्रिकेटला सुरुवात केली. हरभजनला क्रिकेटमध्ये खूप रस होता. त्याची क्षमता त्याचे वडील सरदेव सिंग यांनी ओळखली. त्यांनी भज्जीला जेडीसीए क्रिकेट अकादमीमध्ये दाखल केले. हरभजन सिंगने आपल्या करिअरची सुरुवात फलंदाज म्हणून केली होती. त्याची गोलंदाजी पाहून प्रशिक्षकांनी त्याला गोलंदाज म्हणून करिअर करण्यास सांगितले. १९९८मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यातून हरभजनने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याच वर्षी त्याने न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
२००६मध्ये हरभजनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २०१५पर्यंत त्याने १०३ कसोटी सामन्यात ४१७ विकेट्स घेतल्या होत्या. त्याने २३६ एकदिवसीय सामने खेळले आणि २६९ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

