चेन्नई : आयपीएलच्या लिलावात ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळाडू ग्लेन मैक्सवेल याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. २ कोटी इतकी बेस प्राईज असलेल्या ग्लेन मैक्सवेल ला आपल्या संघात समाविष्ट करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात रस्सीखेच चांगलीच रंगली होती. यानंतर, तब्बल १४.२५ कोटी रुपये इतक्या किंमतीवर त्याला खरेदी करण्यात आले.
विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघाने सर्वात जास्त १४.२५ कोटी रुपयांची बोली लावत ग्लेन मैक्सवेलला संघात घेतलं आहे. बेस प्राईज २ कोटी असलेल्या ग्लेन मैक्सवेलचं नशीब चांगलच फळफळल्याचं दिसून येत आहे. आयपीएलच्या १३ व्या हंगामात मैक्सवेल पंजाबच्या संघाकडून खेळला होता. आता आगामी हंगामात तो आरसीबी कडून खेळताना दिसणार असल्याने फॅन्ससाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे.
आयपीएल लिलावापूर्वी ग्लेन मॅक्सवेलने बेंगलोर संघाकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि त्याची इच्छा बेंगलोरने पूर्ण केली. यांनतर सोशल मीडियावर जणु मिम्सचा पाऊस पडत आहे. ग्लेन मॅक्सवेलची मूळ किंमत २ करोड इतकी होती. अशातच त्याला १४.२५ करोड रुपयांमध्ये खरेदी केल्यानंतर माजी भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवाग यांनीदेखील ट्विटरवर एक गमतीदार व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात एक माणूस डान्स करताना दिसत आहे.
व्हिडिओ खाली सेहवागने लिहिले आहे की, आयपीएल लिलावाच्या वेळी मॅक्सवेलच्या इथे असेच काहीतरी वातावरण असेल. मॅक्सवेलला सलग दुसऱ्यांदा १० कोटींच्यावर बोली लागली आहे. मागील हंगामाच्या लिलावावेळीही त्याला १० कोटींपेक्षा अधिक रकमेची बोली लागली होती.
Maxwell ke yahaan Mahoul during every #IPLAuction pic.twitter.com/aEtihOGvHM
— Virender Sehwag (@virendersehwag) February 18, 2021
The Sensex and Maxwell…. prices and fundamentals……well!!
— Harsha Bhogle (@bhogleharsha) February 18, 2021
Preity zinta be like:????#IPLAuction2021#GlennMaxwell #PunjabKings #IPL2021 pic.twitter.com/Q4exFlK9hD
— Shubham Tripathi (@Shubham_trips24) February 18, 2021
https://twitter.com/Asimdaskumar/status/1362439497820958720?s=20
महत्वाच्या बातम्या
- सिंचन प्रकल्पावरुन जिल्हा परिषद आणि राज्य सरकारमध्ये जुंपली
- .तर पंड्याला खेळवा : सुनील गावसकर
- लॉकडाऊनसारखी कठीण परिस्थिती पुन्हा उद्भवल्यास शेतकऱ्यांना अडचणी येऊ देणार नाही; खोतकर
- यंदा आयपीएल ट्रॉफी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर जिंकणार मैक्सवेलने दाखवला विश्वास
- ग्रामपंचायतींचा कारभार पारदर्शकपणे करा; केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

