🕒 1 min read
मुंबई : देशात लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात काही शिथितला दिल्यानंतर आपल्या गावी जाण्यासाठी हजारो मजूर पायी चालत निघाले होते, तर काही जण मिळेल त्या मार्गाने जीव धोक्यात घालून प्रवास करत होते. मात्र आता महाराष्ट्र सरकारने राज्यात अडकलेल्या नागरिकांना इच्छित स्थळी जाण्याची परवानगी दिली आहे. त्यासाठी, विशेष श्रमिक ट्रेनही सोडण्यात आल्या आहेत. तर, एसटी बसनेही परराज्यातील नागरिकांना सीमारेषेपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. महाराष्ट्र पोलीस विभागातील संबंधित नोडल अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच या प्रवाशांना गावी जाण्यास परवानगी देण्यात येत आहे.
आपत्कालीन परिस्थितीत महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर प्रवास करण्यासाठी खाली दिलेल्या प्रक्रियेनुसार आपण अर्ज करु शकता, असे सांगत महाराष्ट्र पोलीस विभागाने काही नियमावली जाहीर केली आहे. त्यासाठी, नागरिकांना Covid19.mhpolice.in वर ई-पास मिळविण्यासाठी अर्ज करता येईल.
आपात्कालीन परिस्थितीत महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्रा बाहेर प्रवास करण्यासाठी खाली दिलेल्या प्रक्रियेनुसार आपण https://t.co/jR6ROcjBYm वर E-Pass साठी अर्ज करू शकता.
पास केवळ अत्यंत आपात्कालीन परिस्थितीतच देण्यात येईल. pic.twitter.com/YyLL09FGuU
— महाराष्ट्र पोलीस – Maharashtra Police (@DGPMaharashtra) May 13, 2020
फॉर्म भरताना हे करा :
केवळ इंग्रजीतूनच फॉर्म भरा.
सर्व कागदपत्रे एकाच फाईलमध्ये एकत्रित करा.
प्रवास करताना ई-पासची हार्ड किंवा सॉफ्ट कॉपी सोबत ठेवा.
फॉर्म भरताना हे करु नका :
पाससाठी एकापेक्षा अधिकवेळा अर्ज करु नका.
टोकन आयडी सेव्ह करायला विसरु नका.
अधिकृततेशिवाय वैधते पलिकडे पास वापरु का
दरम्यान, सध्या लाखो लोकांकडून स्थलांतरीत होण्यासाठी महाराष्ट्र पोलीस विभागाकडे अर्ज दाखल केला जात आहे. मात्र, योग्यरितीने अर्ज न भरल्यामुळे किंवा, कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे अर्ज रिजेक्ट करण्यात येत आहे. त्यामुळे, पोलीस विभागाने मार्गदर्शक प्रणाली घोषित केली आहे.
‘मोदी जी देशातील माध्यमांना हेडलाईन दिली, मात्र गरिबांना हेल्पलाईनची गरज’
कोरोनामुळे आलियाला वाटतेय ‘या’ जिवलग व्यक्तीची खूप काळजी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
