🕒 1 min read
जयपूर : राजस्थानमध्ये राजकीय धुळवड सुरूच आहे. विधानसभेचे अधिवेशन घ्यावे हा प्रस्ताव राजभवनाने तिसऱ्यांदा फेटाळला असून मुख्यमंत्री गहलोत राज्यपालांना भेटण्यासाठी राजभवनावर पोहोचले आहेत.
करोनाचा काळ सुरू आहे, तसेच अधिवेशन बोलावण्याच्या आधी विधानसभा सदस्यांनी किमान 21 दिवसांची नोटीस दिली पाहिजे, अशी राज्यपालांची भूमिका आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचा हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.
विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना हे अधिवेशन हवे आहे. त्यातून राज्यातील सध्याचा राजकीय पेच सोडवता येईल, अशी सरकारची भूमिका आहे. पण राज्यपाल मात्र अधिवेशन घेऊ देण्यास राजी नसल्याने राजस्थानातील पेच गेले अनेक दिवस प्रलंबित आहे.
दरम्यान, काँग्रसेचे बंडखोर नेते सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांना मुख्यमंत्री गेहलोत यांनी एक नवी ऑफर दिली आहे. पक्षश्रेष्ठींची माफी मागून पुन्हा ते पक्षात येऊ शकतात असं अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे. जयपूरमध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीच्या बैठकीत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. “बंडखोर झालेल्यांना ठेवलेल्या अटी तुम्ही सर्वजण पाहू शकता. जर त्यांना परत यायचं असेल तर ते पक्षश्रेष्ठींची माफी मागू शकतात. पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल,” असं अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे.
नरेंद्र मोदींनी राफेलचं ‘हटके’ ट्विट करत केलं स्वागत
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी निराश न होता पुन्हा प्रयत्न करा-अजित पवार
‘पुण्याची परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा केवळ दिखाव्यासाठी आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
