पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘ मातोश्रीतून बाहेर पडा’ असा सल्ला दिला होता. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अखेर पुण्याचा दौरा करणार असं निश्चित झालं होतं. त्यानुसार आता उद्धव ठाकरे हे उद्याच पुण्याचा दौरा करणार आहे.
घरात बसून कारभार पाहणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर चौफेर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे घरातून बाहेर पडणार असल्याने या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. मात्र, ‘मुख्यमंत्र्यांचा हा दौरा म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे’, अशी टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली. ‘पुण्याची परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा केवळ दिखाव्यासाठी आहे’, असा आरोप जगदीश मुळीक यांनी केला.
‘पुणे महापालिकेत भाजपची सत्ता असल्यानं राज्य सरकारकडून भेदभाव केला जातोय. महापालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 200 कोटींचा खर्च केला. मात्र राज्य सरकारने केवळ तीन कोटी रुपयांची मदत केली. मुख्यमंत्र्यांनी केवळ बैठकीचं नाटक न करता 500 कोटींची मदत जाहीर करावी’, अशी टीका जगदीश मुळीक यांनी केली आहे.
नेमका कसा आहे दौरा-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी 9 वाजता मुंबईतून पुणे शहराकडे निघतील. त्यानंतर साधारणपणे 11.30 वाजेच्या सुमारास ते पुण्यात दाखल होती. पुण्यात आल्यानंतर पुणे शहर आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग संदर्भात सुरू असलेल्या उपाययोजनांसंदर्भात बैठक घेणार आहेत.
यावेळी बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित असणार आहेत. बैठकीत विभगीय आयुक्त तसंच पुणे जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे दौरा संपवून संध्याकाळी 5 वाजता मुंबईकडे निघतील, असा त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम आहे.
धक्कादायक: पीपीई किट बनवणाऱ्या कंपनीतील ४४ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह
राफेल विमानांचं भारतीय भूमीवर आगमन!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

