औरंगाबाद : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने आज(१७ सप्टें.) औरंगाबादमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील सर्व कार्यक्रमांसाठी उपस्थित आहेत. दरम्यान औरंगाबादमधील जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या उद्घाटनवेली ठाकरे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे.
यावेळी बोलत असतांना मुख्यमंत्र्यांनी ‘व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माझी आणि एकत्र आले तर भावी सहकारी’, असे वक्तव्य केले आहे. ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे वेगवेगळे तर्क काढले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी देखील ठाकरेंच्या या विधानावर सुचक वक्तव्य केले आहे. भुजबळ म्हणाले की, राजकीय क्षेत्रात वैचारिक मतभिन्नता असू शकते. मात्र,राजकारणात सर्व एकमेकांशी मैत्री जपतात. त्यात चुकीचे काय?. विरोधी पक्ष हे आपले दुश्मन नसतात ते फक्त आपले राजकारणातच विरोधक आहेत. तसेच महाविकास आघाडीपासून कोणाला धोका असू शकतो पण महाविकास आघाडीला कसलाही धोका नाही.’ असेही ते म्हणाले.
दरम्यान, या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात तसेच अब्दुल सत्तर यांची उपस्थिती होती. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचा नेमका जोर कुणाकडे होता. यावरून वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘दरडी कोसळण्याच्या जागांचा शोध घेण्यासाठी नव्या समितीचे कागदी घोडे नाचवू नका’
- ‘अजितदादा पवार हे केवळ शब्द देणारे, आश्वासन देणारे नेते नसून, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे नेते आहेत’
- मोदींचा वाढदिवस युथ कॉंग्रेस राष्ट्रीय बेरोजगारी दिवस म्हणून साजरा करणार
- ज्यांनी आतापर्यंत लस घेतली नाही त्यांनी लस घेऊन मोदींना वाढदिवसाची भेट द्यावी; केंद्रीय मंत्र्याचे आवाहन
- साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ जाहीर, राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळेंची अध्यक्षपदी निवड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

