Share

राष्ट्रवादीच्या आणखी एका आमदाराने दिला राजीनामा

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा:-लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सर्वत्र विधानसभेचे वारे आहेत. त्यानुसारच भाजप आणि शिवसनेत जोरदार इनकमिंग सुरु आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला गळती लागली असून नेत्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेशाचा धडाकाच लावला आहे. त्यातच राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचा पुतण्या अवधुत तटकरे हे शिवसेने मध्ये प्रेवश करणार या चर्चेला उधान आल्यानंतर अखेर त्यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

अवधुत तटकरे यांनी आज आपला राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे सपुर्द केला आहे. त्यानंतर अवधुत तटकरे हे आदित्य ठाकरेंच्या भेटीला जाणार आहेत. अवधुत तटकरे यांच्या राजीनामा सुनील तटकरे यांना धक्का देणारा असून हा राष्ट्रवादी कॉंगेससाठी मोठा धक्का आहे.

दरम्यान अवधुत तटकरे यांनी (29 ऑगस्ट) रोजी मातोश्रीवर जावून उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यांतर अवधुत तटकरे यांनी प्रवेश करण्याबाबत कोणताच थेट खुलासा केलेला नव्हता. मात्र येत्या दोन दिवसात अवधूत तटकरे आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले होते. त्यानंतर त्यांनी आज राष्ट्रवादीचा कॉंग्रेस आमदार पदाचा राजीनामा दिला असून लवकरच पक्ष बदलाचे संकेत दिले आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!