पुणे:- शेतकरी आंदोलनासंदर्भात सचिन तेंडुलकर यांच्या ट्विटवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ज्यांना ज्या क्षेत्रातले कळते त्यातलंच त्यांनी बोलावं असं विधान केलं होतं. परंतु पवार यांचे बोलणे ऐकून थोडा वेळ हसू आलं, असं रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत म्हणाले होते. तसेच, शरद पवार यांच्यावर टीका करताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का? सध्या ते कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत त्यांनी कधी कुस्ती खेळली होती?, असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला होता.
दरम्यान, एखाद्या क्रीडा संघटनेचे अध्यक्ष होण्यासाठी तो खेळ खेळलेला असणे गरजेचे नाही. क्रिकेटमधील कसोटीपटूंच्या मानधनात वाढ झाली. यामागे कोणाचे कष्ट आहेत, याची माहिती रयत क्रांती संघटनेचे नेते तथा आमदार सदाभाऊ खोत यांना कशी होणार, शेवटी सरड्याची उडी कुंपणापर्यंतच असते, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केली आहे.
शरद पवार यांनी कुस्ती, क्रिकेट, कबड्डी, खो-खो अशा अनेक संघटनांचे राज्य पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत अनेक पदे भूषवली आहेत. ही पदे भूषवताना ते हे खेळ प्रत्यक्ष खेळले नसले तरी त्यांनी खेळांच्या वाढीसाठी जाणीवपूर्वक लक्ष दिले. क्रिकेटमधील कसोटीपटूंच्या मानधनात झालेली वाढ, यामागे कोणाचे कष्ट आहेत, याची माहिती सदाभाऊ यांना कशी होणार?, शेवटी सरड्याची उडी कुंपणापर्यंतच असते, असे काकडे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- उत्तराखंड दुर्घटना : ‘या’ देशाने दर्शविली भारताला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दाखवली
- ‘तुमच्या नंगेपणास कोकणातील भुतेही घाबरत नाहीत, तेथे देवादिकांचे काय घेऊन बसलात !’
- मेहनत फळाला आली : UPSC परीक्षेत साताऱ्याचा प्रथमेश पवार देशात तिसरा
- सचिन,लतादीदी,कोहली यासारख्या दिग्गज सेलिब्रिटींवर खरंच कुणी दबाव टाकू शकेल ?
- वनक्षेत्राला लागलेल्या आगीत 2 हेक्टरवरील झाडे जळून खाक

