Share

राजीव गांधी हे मॉब लिंचिंगचे जनक, भाजप नेत्याचे आणखीन एक वादग्रस्त ट्विट

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीसाठी आज पाचव्या टप्यातील मतदान पार पडत आहे, सात राज्यातील ५१ मतदारसंघात मतदान केले जात आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबदडल केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. दुसरीकडे आणखीन एका भाजप नेत्याने गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे.

दिल्लीचे भाजप प्रवक्ते तेजिंदरपालसिंग बग्गा यांनी ट्विटकरत राजीव गांधी हे मॉब लिंचिंगचे जनक असल्याचे पोस्टर शेअर केले आहे. बग्गा यांनी केलेल्या ट्विटमुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान २०१८ साली काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी इंग्लडमधील एका कार्यक्रमात १९८४ च्या शीख विरोधी दंगलीत कॉंग्रेसचा सहभाग नव्हता, असे विधान केले होते, त्यावेळी तेजिंदरपालसिंग बग्गा यांनीच दिल्लीमध्ये ‘राजीव गांधी द फादर ऑफ मॉब लिंचिंग’चे पोस्टर लावले होते.

राजीव गांधी म्हणजे भ्रष्टाचारी नंबर वन

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधी यांच्याकडून नरेंद्र मोदींवर राफेल घोटाळ्याचा आरोप केला जात आहे. तर मोदी यांनी पलटवार करत राजीव गांधी यांचा जीवनप्रवास भ्रष्टाचारी नंबर वन अशा रुपात संपल्याची टीका केली होती.

मोदीजी आता कर्माची फळे भोगायला तयार रहा

मोदी यांच्या विधानावर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी जोरदार पलटवार केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विटकरत आता युद्ध संपले असून मोदींचे कर्म त्यांची वाट पाहता आहेत, असा घणाघात केला आहे. मोदी यांनी माझ्या वडीलांमध्ये आणले तरी ते आता वाचू शकणार नाहीत, असा इशारा राहुल यांनी दिला आहे.

मोदी, तुम्हाला देश कधीही माफ करणार नाही – राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मोदींवर टीका केली आहे, स्व. राजीव गांधींबद्दलच्या विधानासाठी मोदींना देश कधीही माफ करणार नाही. अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. आकस, सातत्यानं खोटं बोलणं आणि सार्वजनिक जीवनातील कोणत्याही संकेतांचं भान नसणं ह्या तीन गोष्टींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कारकीर्द ओळखली जात होती. आता त्यात भर पडली ती विधीशून्यतेची. स्व. राजीव गांधींबद्दलच्या विधानासाठी मोदी, तुम्हाला देश कधीही माफ करणार नाही, असे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!