Share

संतापजनक! परळीत दोन चिमुकल्या मुलींवर शेजाऱ्याकडून अत्याचार

Published On: 

बीड : परळीचे नाव गेल्या महिन्याभरापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येतच आहे. अशातच परळी तालुक्यात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची खळबळजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. हा प्रकार आठ ते दहा दिवसापुर्वीच घडला, पंरतू भीतीमुळे पीडित मुलींनी कुटुंबीयांना हा प्रकार सांगितला नव्हता. रविवारी या प्रकाराबाबत चिमुकलींनी आईला सांगितल्यावर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलींच्या वडिलांनी आपल्या दोन मुलींवर अत्याचार झाल्याची फिर्यादी दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, आपली एक मुलगी ७ वर्षाची आहे तर एक ८ वर्षाची आहे. दोघींना घराशेजारीच राहणाऱ्या व्यक्तिने घरात नेऊन त्यांच्याशी अश्लील चाळे आणि कृत्य केले. मुलींनी कुणालाही काही सांगू नये म्हणून त्यांना धमकावले.

म्हणून हा प्रकार इतके दिवस उघड झाला नव्हता. अखेर पीडित मुलींनी घरी सांगिल्याने घटना उघडकीस आली. या प्रकरणी सिरसाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक श्रीकांत डोंगरे पाटील या घटनेचा अधिक तपास करत आहेत. या घटनेपासून संबंधीत संशयीत आरोपी फरार आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!