Share

राष्ट्रवादीच्या ‘परिवार संवाद यात्रे’नंतर आता शिवसेनेचं ‘शिवसंपर्क’ अभियान !

Published On: 

मुंबई : कोरोनाचं सावट कमी झाल्यानंतर राजकीय पक्ष येत्या स्थानिक निवडणूक लक्षात घेता पुन्हा जोमानं तयारीला लागल्याचं दिसून येत आहे. पदवीधर व शिक्षक निवडणूक, ग्रामपंचायती निवडणूका, यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वच पक्षांनी आपला मोर्चा वळवला आहे. अशातच, पक्षाला अधिक बळकटी देण्यासाठी विविध यात्रांचं व कार्यक्रमांचं नियोजन केलं जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वात काही दिवसांपूर्वीच राज्यभरात परिवार संवाद यात्रा काढण्यात आली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात गावोगावी कार्यकर्त्यांचे मेळावे देखील घेण्यात आले. यानंतर, आता शिवसेना देखील पक्षबांधणीसाठी सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेची वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली.

या बैठकीला शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेते, मंत्री, आमदार, खासदार आणि राज्यातील सर्व जिल्हा प्रमुख, जिल्हा संपर्कप्रमुख उपस्थित होते. मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच या सर्व नेत्यांची बैठक पार पडल्याने कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार याकडं लक्ष लागलं होतं.

दरम्यान, राज्यभरात शिवसेना ही शिवसंपर्क अभियान राबवणार असल्याचं समोर येत आहे. शिवसेनेचे नेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी यासंदर्भात माध्यमांना माहिती दिली आहे. गावोगावी शिवसेना पोहोचवण्यासाठी शिवसंपर्क अभ्यं राबवण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसारच, 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारीदरम्यान राज्यभरात शिवसेनेचं ‘शिवसंपर्क’ अभियान राबवलं जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!