बीड : मुलाला बोलल्याचा राग डोक्यात धरून सहाय्यक पोलीस निरिक्षकाने राममंदिराच्या पुजाऱ्याला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना गेवराई तालुक्यात उघडकीस आली आहे. या घटनेविरोधात गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत पोलीस अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी करत चकलांबा पोलीस ठाण्याला घेराव घालत आंदोलन केले.
गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील श्रीराम मंदिराचे पुजारी गणपत देशपांडे यांनी पोलीस ठाण्याचे फौजदार दिगंबर पवार यांच्या मुलाला मंदिर परिसरात लघुशंका करण्यास मनाई केली होती. याबाबत मुलाने वडिलांना तक्रार केल्यानंतर पवार यांनी कुठलाही विचार न करता देशपांडे यांना त्यांच्या घरातून बाहेर काढत लाथा बुक्यांनी मारहाण केली. देशपांडे यांना झालेल्या मारहाणीत ते जबर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिकांनी या प्रकरणी फौजदार दिगंबर पवार यांच्याविरोधात पोलीस स्टेशनला घेराव घातला होता. या प्रकरणी बीडचे पोलीस अधीक्षक यांनी घटनेची दखल घेत संबंधित अधिकाऱ्याची बदली करण्याची कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नगरमध्ये उपसरपंचाच्या जाचाला कंटाळून ग्रामसेवकाची आत्महत्या
- ‘शेतकऱ्यांवर आस्मानी संकट कोसळलेय, सुलतानी संकट टाळा’, पंकजा मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- ‘काळजी करू नका, तुम्हाला मदत मिळवून देणारच’, फडणवीसांची शेतकऱ्यांना ग्वाही
- ‘अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये शिवसेना संपविण्याचे काम केले’, सुभाष साबणेंचा आरोप
- ‘देशमुख व परमबीरपैकी एकाला ‘वर्षा’वर तर दुसऱ्याला ‘मातोश्री’वर लपवलेय!’, सोमय्यांचा गंभीर आरोप

