Share

‘शेतकरी आंदोलनाची वर्षपूर्ती, हे वर्ष अन्नदात्यांवरील आत्याचार म्हणून ओळखले जाईल’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांनी सुरु केलेल्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मोदींनी हे कायदे मागे घेण्याची घोषणा केली मात्र संसदेत विधेयक मंजुर करुन हे कायदे रद्द केल्याशिवाय आंदोलन संपवणार नाही, अशी भूमिका या शेतकरी संघटनांनी घेतली आहे. यावर काँग्रेसच्या सरचिटनीस प्रियंका गांधी यांनी ट्विट केले आहे.

प्रियंका गांधी म्हणाल्या, शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाले, शेतकऱ्यांचा सत्याग्रह ७०० शेतकऱ्यांच्या बलिदानानंतर हा भाजपा सरकारचा अहंकार आणि अन्नदात्यांवर केलेले अत्याचार म्हणून हे वर्ष ओळखले जाईल.

भारतीय शेतकऱ्यांचा जयजयकार नेहमी होत आलेला आहे. आणि तो होत राहील. शेतकऱ्यांच्या संघर्षाला आलेले यश हे याचे प्रमाण आहे, जय किसान. असे ट्विट प्रियंका गांधींनी केले आहे. राकेश टिकैत यांनी ‘जोपर्यंत कायदे रद्दबातल होत नाहीत, तोपर्यंत घरवापसी नाही’ असा नारा दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Narendra Modi) यांनी तीन कृषी कायदे (Farm Laws)  मागे घेतले असल्याची माहिती १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता दिली. मोदींनी देशाला संबोधित करण्यासाठी भाषणाला सुरुवात केली त्यात नुकतीच त्यांनी तीन कायदे मागे घेतल्याची घोषणा केली तसेच देशाची माफी देखील मागितली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!