🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. यासाठी सगळेच पक्ष झेंडा फडकवण्यासाठी कंबर कसत आहे. याच अनुषंगाने आता कल्याण डोंबिवलीत भाजपाला मोठा धक्का दिला.
भाजपाच्या तीन माजी नगरसेवकांनी नगरविकासमंत्री व शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपचे डोंबिवलीमधील महेश पाटील, सायली विचारे आणि सुनीता पाटील यांनी हातावर शिवबंधन बांधले आणि शिवसेनेत प्रवेश केला.
भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक महेश पाटील,सायली विचारे आणि सुनीता पाटील तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज शिवबंधन बांधून शिवसेनेत पक्षप्रवेश केला.याप्रसंगी शिवसेना पक्षात त्यांचे स्वागत केले तसेच सामाजिक व राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या pic.twitter.com/wixrwkY2iP
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 22, 2021
या पक्षप्रवेशामधील एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच चर्चेत येत आहे. महेश पाटील यावेळी बोलताना चुकून भाजपत प्रवेश करत असल्याचं म्हटले हे ऐकताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकली. यानंतर महेश पाटील यांनी चूक सुधारत माफ करा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. सवय सुटत नाही सांगत ते देखील हसत होते.
शिवसेनेत प्रवेश करताना नगरसेवक म्हणाला, "मी आज भाजपात प्रवेश करतोय", मागे बसलेल्या श्रीकांत शिंदेंनी सुधारली चूक, तर एकनाथ शिंदें आवरत नव्हतं हसू @BJP4Maharashtra @ShivSena @mieknathshinde pic.twitter.com/haJZIwG3Nn
— Shivraj Yadav | शिवराज यादव ????????????️ (@shiva_shivraj) November 26, 2021
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचं आवाहन केले. तसंच कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्यासाठी पक्षात आलेले कार्यकर्ते अथक परिश्रम करतील,अशी अपेक्षा देखील शिंदेनी व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या:
- ‘अब की बार मोदी सरकार’ची आठवण करून देत शिवसेनेचा हल्लाबोल
- ‘रस्त्यांची देखभाल येत नसेल तर इंजिनीयर्सनी राजीनामा द्यावा’, केरळ हायकोर्टाच्या अधिकाऱ्यांना कानपिचक्या
- 26/11 चा हल्ला हा केवळ मुंबईवर नाही, तर…; फडणवीसांची प्रतिक्रिया
- ‘…याची अपेक्षा नव्हती’, शुभमनने न्यूझीलंडच्या गोलंदाजावर दिली प्रतिक्रिया
- ‘जो चुप रहेगी ज़बान-ए-ख़ंजर…’, न्यायालयाने फटकारल्यानंतर मलिकांचे ट्विट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
