Share

…हा हल्ला दहशतवाद्यांची भ्याड मनोवृत्ती स्पष्ट करणारा- मुख्यमंत्री ठाकरे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी (26-11 Mumbai terrorist attack) नागरिकांचे रक्षण करताना शहिद झालेल्या मुंबई पोलिस, एनएसजी, गृहरक्षक तसेच अन्य सुरक्षा दलातील अधिकारी, जवानांच्या शौर्य व त्यागाचे स्मरण करत अनेकांनी आदरांजली वाहिली आहे. याच दिवशी पाकिस्तानातून (Pakistan) आलेल्या १० दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये अनेक लोकांनी आपला जीव गमवला. या मन हेलावणाऱ्या घटनेला आज १३ वर्ष पूर्ण होत आहेत.

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackray) यांनी ट्विट करत शहिदांना आदरांजली वाहिली आहे. ते म्हणाले आहेत की,’२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद वीर व बळी पडलेल्या नागरिकांना विनम्र अभिवादन.’ तसेच हल्ल्याविरोधात निकराचा लढा देणाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करत हा हल्ला दहशतवाद्यांची भ्याड मनोवृत्ती स्पष्ट करणारा होता अशी निर्भत्सना त्यांनी केली आहे.

दरम्यान, भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील ट्विट करत शहिदांना आदरांजली वाहिली असून आजच्या दिवशी भ्याड आतंकवादी हल्ला झाला होता. जो सार्वभौमत्वावर हल्ला होता. या हल्ल्यादरम्यान मुंबईतील काही महत्वाच्या ठिकाणी टार्गेट करण्यात आले होते. ज्याच्या आधारे केवळ मुंबईलाच नाही तर संपूर्ण आंतराष्ट्रीय समाजाला पराजित करण्याचं लक्ष्य होतं. ज्या प्रकारे हा हल्ला झाला होता. तो कोणालाच विसरता येण्यासारखा नाही. २६-११ हल्ला हा नागरिकांनी संपूर्ण भारतावरील हल्ला मानला होता, असे ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!