Share

अण्णा हजारे यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

Published On: 

🕒 1 min read

पुणे : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांना अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना तीन दिवसांपूर्वी तातडीने खाजगी वाहनाने पुण्यातील रुबी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती सुधारली असून काल त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

रुबी हॉस्पीटलमध्ये अण्णा हजारेंवर अॅजिओप्लास्टी झाली असून त्यांना काही दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. अण्णा हजारेंना अचानक रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्यांच्या अनुयायांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. आता अण्णा हजारे यांची प्रकृती ठणठणीत असून काळजीचे कोणतेही कारण नसल्याचे रुबी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले आहे.

याबाबत शहिद शेख यांनी अण्णा हजारेंचा हॉस्पिटलमधील एक फोटो ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, छातीत हलका त्रास होत असल्याने अण्णा पुण्यात हॉस्पिटल मध्ये दाखल होते. सर्व रिपोर्ट नॉर्मल असल्याने अण्णांना आज डिस्चार्ज मिळाला. असे ट्विटमध्ये म्हंटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!