Share

शरद पवार यांच्या उपस्थितीत अंकुशराव कदम यांचा सत्कार

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा :  एमजीएम विद्यापीठाचे कुलपती शिक्षणमहर्षी अंकुशराव कदम यांनी नुकतीच वयाची 75 वर्षे पुर्ण केली. यानिमित्त शुक्रवारी 20तारखेला सकाळी दहा वाजता अमृतमहोत्सव गौरव सोहळ्याचे आयोजन केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्याहस्ते कदम यांचा सत्कार होणार आहे. असे अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा आमदार विक्रम काळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात सकाळी दहा वाजता कार्यक्रमाला सुरवात होईल. अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री तथा एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम यांची उपस्थिती असेल. यानिमित्त शिल्पकार या गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. प्रा. डॉ. अशोक नाईकवाडे, प्रा. डॉ. रेखा शेळके यांनी ग्रंथाचे संपादन केले आहे. यात अंकुशराव कदम यांच्याशी संबंधित राज्यातील अनेक मान्यवरांचे लेख आहेत.

महात्मा गांधी यांच्या विचारांचा ध्यास घेऊन मराठवाड्यातील कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्याला उच्चशिक्षणापर्यंत पोहचविण्याचे अंकुशराव कदम यांचे कार्य 40 वर्षापासून सुरु आहे. शालेय, उच्च, तंत्र, वैद्यकीय, पत्रकारिता, कृषी व कृषीपुरक व्यवसाय आधारित शिक्षण, व्यवस्थापन, ललीत कला, निसर्गोपचार, खादी प्रचार, फिल्म मेकिंग, संगणक क्षेत्रात संधी उपलब्ध करुन दिल्या.

पत्रकार परिषदेत निलेश राऊत यांनी निवेदन केले. यावेळी समितीचे सचिव रंगनाथ काळे, उद्योजक मधुकारराव मुळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, पद्माकरराव मुळे, फौजिया खान, विजयअण्णा बोराडे, प्रा. प्रतापराव बोराडे, द्वारकाभाऊ पाथ्रीकर, डॉ. बाळासाहेब पवार, डॉ. पी. वाय. कुलकर्णी, भाऊसाहेब राजळे, कदीर मौलाना, चंद्रकांत दानवे, संजय वाघचौरे, सुहास तेंडुलकर आदींची उपस्थिती होती.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1206565996154089473?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1206564072252030976?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!