Share

अनिल राठोड ‘वर्षा’वर, पवारांच्या फोडाफोडीचा बदला घेणार

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा:राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी नगरमध्ये आले होते. दुसऱ्याच दिवशी शिवसेनेचे अहमदनगरमधील माजी आमदार अनिल राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरमध्ये बैठका घेतल्यानंतर शिवसेना-भाजपचे नेते कामाला लागले आहेत. भाजपचे नगर दक्षिणचे उमेदवार सुजय विखे यांना निवडून आणण्यासाठी व रणनिती ठरवण्यासाठी ही भेट झाल्याची माहिती आहे.

अनिल राठोड हे सध्या शिवसेनेचे उपनेते आहेत व ते सलग 25 वर्ष आमदार होते. शिवसेनेची संपूर्ण अहमदनगर शहरासह जिल्ह्याची जबाबदारी अनिल राठोड यांच्या खांद्यावर आहे. शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारासाठी दोन्हीही पक्ष कामाला लागले आहेत. तर सुजय विखेंच्या कार्यकर्त्यांसोबत बैठका सुरु आहेत. त्यामुळे अनिल राठोड यांची मुख्यमंत्र्यांशी भेट ही अतिशय महत्वाची मानली जात आहे.

शरद पवारांनी राष्ट्रवादीचे नगरचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी नगरमध्ये जाऊन बैठका घेतल्या आहेत. याशिवाय भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या दोन पुतण्यांनी पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीने नगरमध्ये केलेली फोडाफोडी आणि जिल्ह्यातील राजकीय वातावरणावर चर्चा करण्यासाठी अनिल राठोड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!