Share

अनिल परब यांच्या अडचणी वाढणार, किरीट सोमय्या दापोली पोलिस ठाण्यात तक्रार देणार

Published On: 

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण परब यांच्या दापोलीतील साई रिसॉर्टची चौकशी करण्याचे आदेश रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तशी माहिती भाजप नेते आणि माजी खासदार किरिट सोमय्या यांनी दिलीय.

सोमय्या यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे. यापूर्वी सोमय्या यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन परब यांच्या रिसॉर्टबाबत तक्रार केली होती. फक्त जावडेकरच नाही तर सोमय्या यांनी ED, CBI, आयकर विभाग आणि महसूल मंत्रालयाकडेही तक्रार केली होती. त्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी या रिसॉर्टची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

या नंतर आज बुधवार 2 जून रोजी दुपारी दापोली पोलिस ठाण्यात तक्रार करणार असल्याचे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे. बुधवारी 2 जून रोजी सकाळी ट्वीट केले आहे. त्यात मी आज दुपारी १२.३० वाजता दापोली पोलिस स्टेशनला अनिल परब साई रिसॉर्ट विरूध्द भारतीय दंड संहिता कलम 420…पर्यावरण संवर्धन अधिनियम कलम 15 महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम कलम 52, 53, 54, 55, 56, 56 (अ), महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 45 अंतर्गत तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!