मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशात सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाटण्याहून मुंबईत आलेल्या आयपीएस अधिकाऱ्याला रविवारी रात्री मुंबई महापालिकेने क्वारंटाइन केलं. त्यावरून सोमवार सकाळपासून बरीच उलटसुलट चर्चा सुरू आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या प्रकरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरे यांची प्रतिमा मलीन करण्याचा षडयंत्र केलं जातं आहे. सुशांत सिंग प्रकरणाशी आदित्य ठाकरेंचा काहीही संबंध नाही असं छातीठोकपणे सांगतो, ज्यांना वाटतं आदित्य यांचा संबंध आहे त्यांनी मीडियासमोर येऊन पुरावे सादर करावेत. पुरावे असतील तर बोलावं असं आवाहन शिवसेना मंत्री अनिल परब यांनी केलं आहे.
अनिल परब म्हणाले की, केवळ युवा नेत्याचं नाव खराब करायचं, मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता वाढतेय ते पाहून अशाप्रकारे नाव खराब करायचं हे सुरु आहे, नरेंद्र मोदींवर ग्रोधा हत्याकांडाचा आरोप आहे, अमित शहांचा सोहराबुद्दीन प्रकरणात नाव घेतलं गेलं, न्या. लोयांच्या मृत्यूप्रकरणी किती नावं घेतली गेली. आरोप करुन प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न याआधीही अनेकदा झाले आहेत. जे लोक व्हॉट्सअपवर हा मेसेज फिरवतायेत ते कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत हे माहिती आहे. आम्ही तक्रार केली आहे, पोलीस तपास करतील, एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे, जे पुरावे असतील ते समोर घेऊन या असं त्यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –
रस्त्यावरील खड्डे आणि तुंबलेल्या पाण्यातून मुंबईकरांची सुटका कधी?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

