पुणे : ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. भाजपा आमदार जगदिश मुळीक हे पुण्यातील स्वारगेट येथील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारसह परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका केली आहे.
मुळीक म्हणाले, अनिल परब, वसुलीतून वेळ मिळाला तर इकडेही लक्ष द्या! महाराष्ट्रभर उभ्या राहिलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलनाला आज स्वारगेट पुणे येथे उपस्थित राहून मी पाठिंबा दिला. आंदोलन उभे राहिल्यापासून आजपर्यंत २८ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्या आत्महत्या नसून सरकारी हत्याच आहेत. असे ट्विट मुळीक यांनी केले आहे.
अनिल परब,
वसुलीतून वेळ मिळाला तर इकडेही लक्ष द्या!महाराष्ट्रभर उभ्या राहिलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलनाला आज स्वारगेट पुणे येथे उपस्थित राहून मी पाठिंबा दिला. आंदोलन उभे राहिल्यापासून आजपर्यंत 28 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्या आत्महत्या नसून सरकारी हत्याच आहेत. pic.twitter.com/DtBHBCyodH
— Jagdish Mulik (@jagdishmulikbjp) November 8, 2021
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणी, एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण, वेतन निश्चिती, विविध भत्ते व सेवा सवलती मिळाव्यात यासाठी ऐन दिवाळीत संप पुकारला आहे. सुरुवातीला महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या वतीने हा संप पुकारण्यात आला होता. या संपाला महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन, विदर्भ एसटी कामगार संघटना आणि महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसने (इंटक) पाठिंबा दर्शविला आहे.
महत्वाच्या बातम्या
- केंद्र सरकारने समीर वानखेडेचा देखील वापर केला हे येत्या काळात स्पष्ट होणार- नाना पटोले
- ‘परमबीर सिंग यांना बेपत्ता करण्याचं काम मोदी सरकारने केलं’, नाना पटोलेंचा हल्लाबोल
- आग प्रतिबंधक सुविधांसाठी २१७ कोटींची गरज- राजेश टोपे
- …या संशोधनातून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप भडकू नयेत- संजय राऊत
- ‘…त्यासाठीच एकांतवासात जातोय’, अमोल कोल्हेंच्या पोस्टमुळे राजकीय चर्चांना उधाण


