Share

‘अनिल परब, वसुलीतून वेळ मिळाला तर इकडेही लक्ष द्या!’, भाजपाची टीका

Published On: 

पुणे :  ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. भाजपा आमदार जगदिश मुळीक हे पुण्यातील स्वारगेट येथील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारसह परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका केली आहे.

मुळीक म्हणाले, अनिल परब, वसुलीतून वेळ मिळाला तर इकडेही लक्ष द्या! महाराष्ट्रभर उभ्या राहिलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलनाला आज स्वारगेट पुणे येथे उपस्थित राहून मी पाठिंबा दिला. आंदोलन उभे राहिल्यापासून आजपर्यंत २८ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्या आत्महत्या नसून सरकारी हत्याच आहेत. असे ट्विट मुळीक यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणी, एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण, वेतन निश्चिती, विविध भत्ते व सेवा सवलती मिळाव्यात यासाठी ऐन दिवाळीत संप पुकारला आहे. सुरुवातीला महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या वतीने हा संप पुकारण्यात आला होता. या संपाला महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन, विदर्भ एसटी कामगार संघटना आणि महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसने (इंटक) पाठिंबा दर्शविला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!