Share

‘शेवटच्या ट्रीटमेंटसाठी आज भेटणार’ म्हणत अनिल कपूरने शेअर केला व्हिडीओ

Published On: 

मुंबई : बॉलिवूड चा झक्कास अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) त्यांच्या फिटनेस आणि अभिनयामुळे चर्चेत असतात. तसेच ते सोशल मीडियावर देखील सक्रिय असून फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांशी संवाद साधतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून जर्मनीमध्ये आहेत. त्यांनी जर्मनी टूरमधील (Germany)  शेवटच्या दिवसाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी आज ट्रीटमेंटचा शेवटचा दिवस आहे आणि त्याच संदर्भात जर्मनीमधील काही डॉक्टरांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यांचा हा व्हिडीओ पाहून अनिल कपूर यांना नेमकं काय झालं? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

दरम्यान अनिल कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये काळ्या रंगाचा कोट परिधान केला आहे. या व्हिडीओमध्ये जर्मनीमध्ये बर्फ पडत असल्याचे दिसत आहे आणि अशातच अनिल कपूर तेथील रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला ‘रॉकस्टार’ चित्रपटातील ‘फिर से उड चला’ हे गाणे ऐकू येत आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी, ‘बर्फ पडत असताना एक वॉक. जर्मनीमधील एक शेवटचा दिवस. मी डॉ. मुलेर यांना शेवटच्या ट्रीटमेंटसाठी आज भेटणार आहे. त्यांचे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मानापासून आभार’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. हे कॅप्शन वाचून अनेकांना अनिल कूपर यांना काय झाले आहे? ते कोणत्या आजाराने त्रस्त आहेत? असे अनेक प्रश्न पडले आहेत.

https://www.instagram.com/reel/CWu6Sc-DgxL/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेता अनिल कपूर यांनी गेल्या वर्षी सोशल मीडियाद्वारे ऍचिलीस टेंडिनाइटिसने (Achilles Tendinkitis) या आजाराने त्रस्त असल्याचे म्हटले आहे. कोणतीही सर्जरी न करता त्यांनी या आजारावर मात केली होती. आता पुन्हा अनिल कपूर याच आजारावर उपचार घेण्यासाठी जर्मनीला गेलेत का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण अनिल कपूर यांनी याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र त्यांच्या शेअर केलेल्या व्हिडिओमुळे तसेच त्या गाण्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!