Share

अनिल देशमुख ईडीसमोर ‘या’ तीन कारणांमुळे हजर झाले; सुधीर मुनगंटीवारांचा दावा

Published On: 

चंद्रपूर : मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनेकवेळा समन्स बजावूनही ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाले नव्हते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले अनिल देशमुखआज सोमवारी ईडी कार्यालयात दाखल झाले. जबाब नोंदवण्यासाठी ते ईडी कार्यालयात दाखल झाले. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर १०० कोटी वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर अनिल देशमुखांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून केंद्रीय तपास यंत्रणा देशमुखांच्या मागे लागल्या आहेत.

दरम्यान, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देशमुख यांच्या ईडी समोर हजर होण्यावर काही दावे केलेत. संपत्तीवर टाच येणं, अटकपूर्व जामिनाच्या शक्यता संपल्या आणि सचिन वाझे महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात येणं ही कारणे समजल्याने ते ईडीसमोर हजर झाले, असावेत अशी शक्यता मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

सचिन वाझे महाराष्ट्र पोलिसांच्या एसआयटीच्या ताब्यात आला आहे. आपण सांगू ते एसआयटी सचिन वाझेकडून वदवून घेतील आणि त्यामुळे मी आता ईडी समोर गेलो तर धोका नाही असं देशमुख यांना वाटलं असावं. तसेच मुखांच्या हे लक्षात आलं असावं की कोर्टातून आपल्याला अटकपूर्व जामीन मिळू शकत नाही त्यामुळं ते ईडीसमोर हजर झाले असावेत. शिवाय देशमुख यांच्या संपत्तीवर टाच येत असल्याचं लक्षात आल्यानं ते ईडीसमोर हजर झाले असा दावा मुनगंटीवार यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!