Anil Deshmukh । मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख हे सध्या १०० कोटींच्या कथित वसुलीच्या आरोपावरून आर्थर रोड जेलमध्ये आहेत. आज अचानक आर्थर रोड जेलमध्ये देशमुख चक्कर येऊन पडल्याची माहिती समोर आली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अनिल देशमुख यांना अटक केली. ईडीने अटक केल्यावर त्यांची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली. मात्र, अटकेत असल्यापासून त्यांना अनेक शारीरिक समस्यांचा त्रास होत असल्याची माहिती समोर आली होती.
सकाळी ११ वाजताची ही घटना आहे. अनिल देशमुख यांना तुरुंगातच चक्कर आल्याने ते जागेवर खाली पडले. त्यानंर तेथील तुरुंग अधिकाऱ्यांनी तत्काळ डॉक्टरांना पाचारण केलं. तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असताना त्यांचा अतिशय उच्च रक्तदाब होता. त्यानंतर काही वेळातच त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील दोन ते तीन दिवस त्यांना रुग्णालयातच ठेवलं जाईल, असा निर्णय जेल अॅथॉरिटीने घेतल्याची माहिती कळतीये.
दरम्यान, अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांनी १०० कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितले होते असा आरोप केला होता. पुढे हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेल्यानंतर कोर्टानं या प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. कोर्टाच्या आदेशानंतर सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाईस सुरुवात केली होती. अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Aditya Thackeray | बंडखोरांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे आक्रमक!, सभांमधील गर्दी पाहून भाजपही चिंतेत
- Ghulam Nabi Azad | ‘जुना व्यक्ती पक्ष सोडून गेला हे दुर्दैवी, दोन वर्षापुर्वी दिलेल्या पत्राचा…’; पृथ्वीराज चव्हाणांची खंत
- Indian Festivals | शेतकऱ्याचा नाद खुळा; पोळ्यानिमित्त बैल जोडी धुण्यासाठी थेट वॉशिंग सेंटरवर
- Eknath Shinde | कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफीची सवलत – मुख्यमंत्री
- Sanjay Rathod | सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानूण आमच्या सरकारचे काम – संजय राठोड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

