पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. 243 जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये मतदार पार पडल्यानंतर आज मतमोजणी होणार आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यासह 3733 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. कोरोना काळातील ही सर्वात मोठी निवडणूक आहे. राज्यात मतमोजणीसाठी 38 जिल्ह्यांमध्ये 55 मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.
नितीश कुमार पुन्हा सत्तेत येणार की तेजस्वी यादव विजय मिळवणार हे आज स्पष्ट होईल. बिहार विधानसभा निवडणुकीत सुरुवातीच्या कलांनुसार भाजप-जेडीयू यांच्या युतीने आघाडी घेतली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव यांचा करिष्मा चालणार असून महागठबंधनला स्पष्ट बहुमत मिळेल असा दावा सर्वच माध्यमांनी एक्झिट पोलद्वारे केला होता. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या दोन तासांमधील चित्र जवळपास तसेच होते. मात्र १० वाजेनंतर आता दुपारी १२.३० वाजेपर्यंत एनडीए अर्थात नितीश कुमार यांनी आघाडी कायम ठेवली आहे.
#FLASH NDA crosses halfway mark as per EC trends for 238 of 243 seats, leading on 125 seats – BJP 70, JDU 48, VIP 6, HAM 1
Mahagathbandhan ahead on 101 seats – RJD 62, Congress 20, Left 19
BSP leads on 1, AIMIM on 2, LJP on 5 & independents also ahead on 4#BiharElectionResults pic.twitter.com/sguXzy5Ill
— ANI (@ANI) November 10, 2020
नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत असलेल्या एनडीएने देखील दमदार मुसंडी मारायला सुरुवात केली आहे. आताच हाती आलेल्या कलांनुसार एनडीए सध्या १२५ जागी आघाडीवर आहे. यात भाजपा ७० जागा, जदयू ४८, व्हीआयपी ६, तर हम एका जागेवर आघाडीवर आहे. महाआघाडीने सध्या १०१ जागांवर आघाडी घेतली आहे. यात राजद ६२, काँग्रेस २० तर डावे १९ जागांवर आघाडीवर आहे.
दरम्यान, आता राजकीय प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. ‘बिहारच्या जनतेने लालूप्रसाद यादव व काँग्रेसचे गुंडाराज नाकारले, अशी टीका भाजपचे नेते आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केली आहे.नितीशकुमार यांनी बिहार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात परिवर्तनाचे काम केलं. सर्व सामान्य जनतेने एनडीएला कौल दिला, असं अनिल बोंडे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाला हरवल्यानंतर अजितदादांच्या कामाचा धडाका सुरु!
- बिहारमध्ये मुख्यमंत्री पदाबाबतचा शब्द भाजप पाळणार की शब्द फिरवणार ?
- महात्मा गांधीप्रमाणे अर्णबला त्रास दिला जातोय : संबित पात्रा
- ‘आरोपीला सहानुभूती दाखवण्याऐवजी राज्यपालांनी नाईककुटुंबाला सहानुभूती दाखवायला हवी होती’
- कृषी विद्यापीठांमधील कर्मचाऱ्यांचे आंदोलन; प्राजक्त तनपुरेंनी घेतली आंदोलकांची भेट!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

