Share

‘उद्धव ठाकरे याचं राजकारण सुडाचं’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : ‘जलयुक्त शिवार योजना थांबवणं. त्याला स्थगिती देणे, निधी बंद करुन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश काढणे ही अतिशय चिंतेची बाब आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आणि ग्रामीण भागातील जनतेच्या तोंडचं पाणी पळवणारी आहे. आता ही योजना फक्त रोजगार हमी योजनेत टाकल्याने पुढील 5 वर्षात होणाऱ्या कामांना 25 वर्षे चालणार आहे,’ असे म्हणत आरोप माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी सरकार टीका केली आहे.

पुढे बोलताना बोंडे म्हणाले, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जलयुक्त शिवार या प्रकल्पाला स्थगिती देऊन सुडाचं राजकारण करत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले चांगले काम पुसून टाकण्याचा हा अट्टाहास आहे, असे बोंडे म्हणाले.

तसेच ‘आम्ही शेतकऱ्यांना चिंतामुक्त करु असे उद्धव ठाकरे म्हणतात. पण जलयुक्त शिवार योजनेला स्थगिती देऊन त्यांना चिंतेत टाकण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे. असाही आरोप अनिल बोंडे यांनी केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारच्या काळात सुरु असलेल्या अनेक प्रकल्पांना स्थगिती दिली आहे. तसेच हिवाळी अधिवेशनाच्या शेवटी च्या दिवशी 2 लाखांपर्यंत शेतकरी कर्जमाफी देखील सरकाने केली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!