टीम महाराष्ट्र देशा – देशात करोनासारख्या आजारानं थैमान घातलं आहे. त्यातच सरकारकडूनही अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. पण सध्या यावरूनही राजकारण होतानाही दिसत आहे. सामानाचे संपादक खासदार संजय राऊत आपल्या अग्रलेखांमधून भाजपाला गांभीर्य नसलेला पक्ष म्हटलं होतं.
तसंच दंडुका पडल्याशिवाय डोकं ठिकाणावर येणार नाही, असं संपादकीयमधून नमूद केलं होतं. आता यावरून भाजपा नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे. “संजय राऊत म्हणजे पवारांच्या घरचे खरूजलेले कुत्रे आहेत,” असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे.
अनिल बोंडे यांनी ट्विटरवरून म्हटलंय “ही राजकारण करण्याची वेळ नाही. विरोधी पक्षावर टीका करणारे संजय राऊत हे कोण आहेत? ते शरद पवार यांच्या घरचे खरूजलेले कुत्रे आहेत. या परिस्थितीत केंद्रातील आणि राज्यातील सरकार सोबत आहे,” यावेळी त्यांनी एका खाजगी वृत्त वाहिनीची लिंकही शेअर केली आहे. यात त्यांनी राऊतांवर वादग्रस्त टीका केली आहे.
https://twitter.com/DoctorAnilBonde/status/1245192699273187330
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

