Share

अँग्री यंग मॅन विराटला भर मैदानात राग झाला अनावर; पहा व्हिडीओ

Published On: 

ऑस्ट्रेलिया : भारताचा कर्णधार विराट कोहली हा सामन्याच्या दुसऱ्या दिवशी चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. पृथ्वी शॉकडून क्षेत्ररक्षण करताना मोठी चुक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर कोहलीचा संताप अनावर झाला आणि त्याने पृथ्वीला अपशब्द वापरले.

पृथ्वीने यावेळी नेमकी कोणती मोठी चुक केली, याचा व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. ही गोष्टी घडली ती २३व्या षटकात. त्यावेळी भारताचा जसप्रीत बुमरा गोलंदाजी करत होता. या षटकात बुमराने एक बाऊन्सर टाकला.

या बाऊन्सरवर मार्नस लाबुशेनने पुलचा फटका मारला. त्यावेळी हा चेंडू हवे उडाला आणि पृथ्वी तिथे फिल्डिंग करत होता. पृथ्वीसाठी हा एक चांगला झेल होता. पण पृथ्वी यावेळी गडबडला आणि त्याने हा झेल सोडला. त्यानंतर कोहलीचा राग अनावर झाला आणि कोहलीने पृथ्वीला अपशब्ध वापरला.पृथ्वी सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्ममध्ये नाही.

https://twitter.com/Dip_D_Rocker/status/1339845214656032768

पहिल्या टेस्टमध्ये भारताचा ओपनर पृथ्वी शॉ पुन्हा अपयशी ठरला आहे. मॅचच्या दुसऱ्याच बॉलला शॉ शून्य रनवर आऊट झाला. गेल्या काही महिन्यांपासून पृथ्वी शॉ फॉर्मसाठी झगडत आहे. आयपीएलमध्येही त्याला खराब कामगिरीमुळे दिल्लीच्या टीमने बाहेर बसवलं होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यातही पृथ्वी शॉ अपयशी ठरला.

पहिली टेस्ट मॅच संपल्यानंतर विराट कोहलीने भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या कसोटी सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली ‘पॅटरनिटी’ लीव्हवर जाणार आहे. विराटच्या गैरहजेरीमध्ये अजिंक्य रहाणे उरलेल्या तीन मॅचमध्ये भारताचं नेतृत्व करेल.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!