मुंबई : भारत आणि चीनमध्ये सध्या मोठा संघर्ष सुरु आहे. या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्यामुळे देशभरात संतप्त भावना उमटली होती. कॉंग्रेसनेते खा.राहुल गांधी रोज सरकारवर याच मुद्द्यावरून टीका करत आहेत. सोबतच या संघर्षानंतर चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी होऊ लागली आहे. या मागणीवरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपा समर्थकांवर टीका केली आहे.
चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची या मागणीवर जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावरून टीका केली आहे. त्यांनी ट्विट केले आहे कि, “विदेशमंत्री जयशंकर यांच्या मुलाच्या संस्थेला चीनकडून ३ कोटीच्या आसपास अनुदान. अजित डोवालांच्या संस्थेचे ९ चिनी संस्थांशी घनिष्ठ संबंध. आणि आमचे स्वयंघोषित देशभक्त निघाले चिनी मालावर बहिष्कार टाकायला!,” अशा शब्दात आव्हाड यांनी टीका केली आहे.
विदेशमंत्री जयशंकर यांच्या मुलाच्या संस्थेला चीनकडून ३ कोटीच्या आसपास अनुदान. अजित डोवालांच्या संस्थेचे ९ चिनी संस्थांशी घनिष्ठ संबंध. आणि आमचे स्वयंघोषित देशभक्त निघाले चिनी मालावर बहिष्कार टाकायला!https://t.co/9QDXvUVHtd
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 28, 2020
१५ जून रोजी रात्री गलवान व्हॅलीत चीन व भारतीय सैन्यामध्ये झटापट झाली. हा संघर्ष शिगेला गेल्यानं २० भारतीय जवान यात शहीद झाले होते. तर चीनचेही काही सैनिक मरण पावले होते. मात्र, या घटनेनंतर सीमेवर तणाव वाढला.त्याचबरोबर देशातही संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. चिनी सैन्यानं गलवान व्हॅलीत केलेल्या या कृत्यानंतर देशभरातून चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत आहे.
शरद पवार यांच्याबद्दल माझ्या मनात जितेंद्र आव्हाडांपेक्षा जास्त आदर – चंद्रकांत पाटील
वाह रे मोदी तेरा खेल, सस्ती दारु मेहंगा पेट्रोल; पुण्यात कॉंग्रेसचे जोरदार आंदोलन
‘एखाद्या व्हायरसप्रमाणे आपला राजकिय रंग बदलणाऱ्या पडळकरांनी तारतम्य बाळगावे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

