Share

वाह रे मोदी तेरा खेल, सस्ती दारु मेहंगा पेट्रोल; पुण्यात कॉंग्रेसचे जोरदार आंदोलन

Published On: 

🕒 1 min read

पुणे : देशभरात आज (२९ जून) पुन्हा पेट्रोल-डिझेलचे दर वाढलेले पाहायला मिळत आहेत. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ५ पैशांची वाढ झाली आहे तर डिझेलच्या दरात प्रति लिटर १२ पैशांची वाढ झाली आहे. काल (२८ जून) पेट्रोल-डिझेलमध्ये कोणतीही दरवाढ झाली नव्हती. मात्र, आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत. गेल्या महिन्यात उत्पादन शुल्कात मोठी वाढ करण्यात आल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

गोटे यांना काहीही बोलण्याची मुभा त्यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही – गिरीश महाजन

कोरोनाच्या बिकट परिस्थितीला जनता तोंड देत असताना इंधनाच्या दरात सातत्याने वाढ करुन जनतेची खुलेआम लूट करण्याचा कार्यक्रम मोदी सरकारने चालवला आहे. याच लुटमारी विरोधात काँग्रेस पक्ष २९ जूनला देशव्यापी आंदोलन करत आहे. या आंदोलनातून इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी केंद्र सरकारकडे कॉंग्रेस तर्फे केली जात आहे.

या दरवाढीच्या विरोधात कॉंग्रेसने पुण्यात जोरदार आंदोलन केलं आहे. या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे देखील सहभागी झाले होते. ‘वाह रे मोदी तेरा खेल, सस्ती दारु मेहंगा पेट्रोल’ असा फलक हाती घेऊन थोरात आंदोलनात सहभागी झाले होते.

दरम्यान, तेल कंपन्या देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एकाच दिवशी वाढवतात, परंतु राज्यांमध्ये त्यांचे दर वेगवेगळे आहेत कारण त्यावर आकारण्यात येणारा सेल टॅक्स किंवा व्हॅट वेगवेगळ्या राज्यात बदलतात. मुंबईत पेट्रोलचे दर हे प्रचंड वाढले आहेत. मुंबईत पेट्रोलचे दर हे ८७.१९ रुपयांवर पोहचले आहेत. तर डिझेलचे दर हे ७८.८३ पर्यंत गेले आहेत.

लॉकडाऊनमध्ये शिवभोजन थाळीने भागवली भूक, आतापर्यंत २८ लाख ८५ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप

दरम्यान, राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या तुलनेत डिझेलची किंमत वाढलेली पाहायला मिळत आहे. सध्या दिल्लीत पेट्रोलचा दर हा ८०.४३ रुपये आहे तर डिझेलचा दर ८०.५३ रुपये एवढा आहे. दिल्ली सरकारने व्हॅटमध्ये वाढ केल्यामुळे दिल्लीत डिझेल पेट्रोलपेक्षा महाग झाले आहे.

दिल्ली सरकारने डिझेलवरील व्हॅट दर 16.75% वरुन 30% पर्यंत वाढविला आहे. त्याचप्रमाणे पेट्रोलवरील कराचा दर 27% वरुन 30% करण्यात आला. दिल्लीत डिझेलचे दर देशभरात दुसर्‍या क्रमांकावर आहेत. राजस्थानमध्ये डिझेल सर्वात महाग आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!